आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात राहुल यांनी भारतातील विरोधी पक्ष व नेत्यांना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला. यासंबंधीचा एक व्हिडिओ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी शेअर केला आहे.
राहुल यांच्या या विधानावर भाजपने हरकत नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले - 'राहुल परदेशात भारताला बदनाम करत आहेत.'
राहुल यांनी केंब्रिजमध्ये केली 3 मोठी विधाने
1. माझा फोन रेकॉर्ड केला जात होता
"माझ्या फोनची हेरगिरी केली जाते. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. भारतातील विरोधी पक्षनेता म्हणून असा दबाव मला नेहमीच सहन करावा लागतो. बहुतांश राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस आहे. माझ्या फोनमध्येही पेगासस होते. मला गुप्तहेर अधिकाऱ्यांनी बोलावून सांगितले होते की, तुम्ही फोनवर बोलताना सावधगिरी बाळगा. कारण आम्ही ते रेकॉर्ड करत आहोत. हा एक असा दबाव आहे, जो आम्हाला नेहमीच जाणवतो. "
2. भारतात मीडिया व लोकशाही संरचनेवर हल्ला
"विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. माझ्याविरोधातही अनेक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत. यातील अनेक गुन्हे चुकीच्या कारणांसाठी दाखल करण्यात आलेत. देशातील मीडिया व लोकशाही व्यवस्थेवर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर विरोधक म्हणून तुमच्यासाठी बोलणे अवघड होते. "
3. विरोधक मुद्यांवर बोलत असताना, तुरुंगात डांबले
"लोकशाहीसाठी आवश्यक असलेली संसद, स्वतंत्र प्रेस, न्यायपालिका या सर्वच संरचना विवश झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही भारतीय लोकशाहीच्या मूळ संरचनेवरील हल्ल्याचा सामना करत आहोत. भारतीय संविधानात भारताला राज्यांचा संघ म्हटले आहे. त्या संघाशी चर्चा गरजेची आहे. आता ही बातचितच संकटात सापडली आहे. हे छायाचित्र संसदेसमोरील आहे. विरोधी पक्षांचे नेते काही मुद्यांवर चर्चा करत होते. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. असे 3 ते 4 वेळा झाले. ते अत्यंत हिंसक होते. "
अनुराग म्हणाले - पेगासस राहुल यांच्या डोक्यात
अनुराग ठाकूर पेगासस मुद्यावर म्हणाले - 'हे कुठेही नाही तर राहुल यांच्या डोक्यात आहे. त्यांनी कोणत्या भीतीने आपला फोन जमा केला नाही. त्या फोनमध्ये असे काय होते. सततचे पराभव त्यांना पचत नाहीयत. राहुल परदेशात जाणून आपल्या परदेशी मित्रांच्या मदतीने भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अखेरीस काँग्रेसचा अजेंडा काय आहे?'
गतवर्षी मे महिन्यातही केंब्रिजमध्ये दिले होते व्याख्यान
राहुल गांधी यांनी यापूर्वी गतवर्षी मे महिन्यात केंब्रिज विद्यापीठात गेले होते. ते तिथे आयडियाज फॉर इंडिया या विषयावर बोलणार होते. पण त्यात त्यांनी मोदी सरकावर तिखट टीका केली होती. ते म्हणाले होते की, मोदी सरकार संसद व निवडणूक आयोगासारख्या देशाच्या घटनात्मक संस्थांना आपले काम करू देत नसल्याचा आरोप केला होता. भाजपने त्यांच्या या विधानावर हरकत नोंदवली होती. देशाच्या पंतप्रधानावर परदेशात असा आरोप का करण्यात आला, असा सवाल भाजपने या प्रकरणी केला होता.
राहुल गांधींनी फोन तपासणीसाठी का दिला नाही -ठाकूर
अनुराग ठाकूर पत्रकारांना म्हणाले - "राहुल गांधी परदेशात जाऊन वाद घालत आहेत. पेगासस त्यांच्या डोक्यात आहे. त्यांनी त्यांचा फोन तपासणीसाठी का दिला नाही हे त्यांना विचारा. पीएम मोदींच्या नेतृत्वात जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे. हे मोठ-मोठे नेते म्हणत आहेत. इटलीच्या पंतप्रधान मोदींविषयी काय म्हणाल्या हे राहुल गांधींनी ऐकले पाहिजे."
लर्निंग टू लिसन म्हणजे ऐकण्याच्या कलेवर बोलले राहुल
राहुल यांच्या 7 दिवसीय ब्रिटन दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील बिझनेस स्कुलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आम्ही लोकशाही मूल्यांचा अभाव असणारे जग तयार होताना पाहू शकत नाही. त्यामुळे आम्हाला याविषयी नव्याने विचार करण्याची गरज आहे. ऐकण्याची कला खूप पॉवरफूल असते. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.