आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Said The Prime Minister Says That He Has Given The Option; The First Option Is Hunger, The Second Unemployment And The Third Is Suicide

कृषी कायदे शेतकऱ्यांनाच संपवतील:पहिल्या कायद्याने बाजार समित्या संपतील, दुसऱ्या कायद्याने बडे उद्योजक अमाप साठेबाजी करतील; मोदींवर राहुल गांधींचा निशाणा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल यांच्या भाषणाच्या सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांनी गदारोळ सुरू केला.

काँग्रेस नेते राहुल गांधींनी गुरुवारी लोकसभेत बजेटवर चर्चेदर्यान कृषी कायद्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, 'पंतप्रधान म्हणतात की, त्यांनी पर्याय दिला आहे, मात्र पहिला पर्याय भूक, दुसरा बेरोजगारी आणि तिसरा आत्महत्या आहे'

राहुल कृषी कायद्याविषयी पुढे म्हणाले की, 'पहिल्या कायद्याचा मजकूर आहे की, कोणतीही व्यक्ती देशात कुठेही कितीही धान्य, भाजी, फळ खरेदी करु शकते. जर देशात अमर्याद खरेदी असेल तर बाजारात कोण जाईल? पहिल्या कायद्याचा मजकूर बाजार रद्द करणे आहे. दुसर्‍या कायद्यातील मजकूर म्हणजे सर्वात मोठे उद्योगपती धान्य, फळे आणि भाज्या साठवू शकतात, याची मर्यादा नाही. ''

राहुल म्हणाले - चार लोक देश चालवत आहेत
राहुल म्हणाले की, तिसर्‍या कायद्यातील मजकूर असा आहे की जेव्हा शेतकरी उद्योगपतींसमोर जाऊन त्यांच्या उत्पादनाच्या पैशांची मागणी करतील, तर त्यांना न्यायालयात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. काही वर्षांपूर्वी कौटुंबिक नियोजनाविषयी एक घोषणा होती - 'हम दो व हमारे दो' आज काय घडत आहे, जसा कोरोना दुसऱ्या रुपात येतो, तसेच हे देखील नव्या रुपात येत आहे. आता चार लोक देश चालवत आहेत, त्यांचा नारा आहे हम दो हमारे दो.

राहुल यांच्या भाषणावेळी गदारोळ
राहुल यांच्या भाषणाच्या सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांनी गदारोळ सुरू केला. त्यांच्या भाषणादरम्यान अनेक वेळा घोषणाबाजी झाली. मागून आवाज आला की, ही काँग्रसची बैठक नाही. स्पीकरने अनेक वेळा राहुल यांना टोकत म्हटले की, तुम्ही बजेटवर चर्चा करा.

'पहिल्यांदा शेतकऱ्यांना भूकेने मरावे लागेल'
काँग्रेस नेते म्हणाले, 'हम दो और हमारे दो हा देश चालवतील. पहिल्यांदा हिंदुस्तानच्या शेतकऱ्यांना उपाशी मरावे लागेल. हा देश राजगार निर्माण करु शकणारर नाही. हा पहिला प्रयत्न नाही. हे काम पंतप्रधानांनी हम दो हमारे दो साठी नोटबंदीमध्ये सुरू केले होते. पहिली जखम नोटबंदी होती. तेव्हा त्यांचा हेतू होता की, नोट काढा आणि हम दो हमारे दो यांच्या खिश्यात टाका.'

'तुम्ही शेतकरी, मजुरांचा कणा मोडला'
राहुल गांधी पुढे म्हणाले, 'लॉकडाऊन दरम्यान जेव्हा गरीबांनी बस आणि ट्रेनचे तिकीट मागितले तेव्हा त्यांना नकार दिला. ते म्हणाले की, तुम्ही पायी घरी जाल. (बजेटवर बोलण्याच्या मागणीवर) मी बजेटवरही बोलेल, मी फाउंडेशन बनवत आहे आता. पहिले नोटबंदी, नंतर जीएसटी आणि नंतर कोरोनाच्या वेळी त्याच 8-10 लोकांचे कर्ज माफ केले. हिंदुस्तानची रोजगारचीही सिस्टम आहे. स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीही संपली आहे. आज नाही, उद्याही हा देश रोजगार निर्माण करु शकत नाही. कारण तुम्ही शेतकरी, मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांचा कणा मोडला आहे.'

तुम्हाला कायदा मागे घ्यावाच लागेल
राहुल म्हणाले की, हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. हे देशाचे आंदोलन आहे. शेतकरी फक्त रस्ता दाखवत आहेत आणि अंधारात टॉर्च दाखवत आहे. एका आवाजात संपूर्ण देश हम दो-हमारे दोच्या विरोधात जात आहे. तुम्ही हे लिहून घ्या. तुम्ही विचार करत असाल की, हिंदुस्तानचे गरीब, मजूर, शेतकऱ्यांना तुम्ही हटवाल. पण ते एक इंचही मागे हटणार नाहीत. ते तुम्हाला हटवतील. तुम्हाला कायदा मागे घ्यावाच लागेल.

बातम्या आणखी आहेत...