आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Says, Why Was The Letter Sent At A Time When Sonia Gandhi Was Admitted In The Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींचा प्रश्न:सोनिया गांधी रुग्णालयात होत्या तेव्हाच पत्र का पाठवले, राहुल गांधींचा सवाल, पक्षातील 23 नेत्यांनी नेतृत्वाच्या मुद्द्यावर पाठवले होते पत्र

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या कार्यकारी समिती महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये सध्या सुरू आहे. यामध्ये काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला पक्ष अध्यक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे. यानंतर नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. दरम्यान काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पत्र पाठवत पत्र नेतृत्त्वात बदल करण्याची मागणी केली होती. यावर आता सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवले?असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

सोनिया गांधी आजारी असतानाच पत्र का पाठवले?
राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावरुन सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवण्यात आले? असा सवाल राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत विचारला आहे.

पत्रात काय होते?
23 काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी आणि शशी थरूर यांच्यासह 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील मोठ्या बदलांवर भर दिला. ते म्हणाले - नेतृत्व पूर्णवेळ (पूर्ण वेळ) आणि प्रभावी असले पाहिजे, जे या क्षेत्रात सक्रिय असले पाहिजे. त्याचा परिणामही दिसायला हवा. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणुका घेण्यात याव्यात. संस्थेत नेतृत्व करणारी यंत्रणा त्वरित तयार करण्यात यावी. जेणेकरून पक्षाला पुनरुज्जीवन करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. मात्र, त्यांनी असे लिहिले नाही की कॉंग्रेस अध्यक्ष हे बिगर गांधी कुटुंबातील असावेत.