आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Sister Priyanka Cute Moment Video; Bharat Jodo Yatra | Brother Sister Love

राहुल गांधींकडून बहिणीवर प्रेमाचा वर्षाव Video:'भारत जोडो यात्रे'त दिसून आलं राहुल अन् प्रियंका गांधींचं अतूट बॉन्डिंग

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

"फूलों का तारों का, सबका कहना है... एक हजारों में मेरी बहना है, सारी उमर हमें संग रहना है" हे भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यावर लिहिलेले हे गाणे आज पुन्हा चर्चेत आले आहे. 'भारत जोडो यात्रे'तील काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राहुल आणि प्रियंका यांच्या नात्यातील अतूट प्रेम दिसून येत आहे.

काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये मंगळवारी पोहोचली आहे. यावेळी स्टेजवर राहुल आणि प्रियांका एकत्र दिसून आले. राहुल गांधींकडून बहिणीवर प्रेमाचा वर्षाव करण्यात आला. भावा-बहिणीचं हे निखळ प्रेम पाहून उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्यांने टाळ्यांचा कडकडाट केला. तर हा व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसकडून "भाई-बहिणीचे शुद्ध प्रेम" असे कॅप्शन दिले. तर व्हिडिओच्या बॅकग्राउंडला "चार दिशाओं जैसी तुम हो..." हे गाणे लावले आहे.

राजकीय कुटुंबात जन्माला आल्याने राहुल आणि प्रियंका यांचे बालपण बालपण अत्यंत क्लेशकारक घटना आणि हिंसाचाराचे साक्षीदार राहिले आहे. कमी वयातच आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्या विरहाचे दु:ख त्यांनी सोसले. दोघांच्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण दोन्ही भावंडांचे प्रेम अतूट राहिले.

प्रियंका गांधी आपल्या भावाला आपला सर्वात चांगला मित्र मानतात. राहुल गांधी जेव्हाही राजकीय संकटात सापडतात. तेव्हा प्रियंका गांधी त्यांच्यासोबत उभ्या असतात. भारत जोडो यात्रेदरम्यानही प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांना प्रत्येक पावलावर साथ दिली आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासमवेतचे लहानपणीचे फोटो कोलाज करुन ट्विट केले होते. ट्विटमध्ये लिहले की, तुम्हा सर्वांना भावा-बहिणीमधील प्रेम, विश्वास यांच प्रतीक असलेल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा. प्रियांका गांधी यांनी आपले लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

राहुल योद्धा, सत्याचा मार्ग सोडणार नाही

प्रियंका गांधी म्हणाल्या की- "माझा मोठा भाऊ... राहुल यांच्याकडे हात करत....इकडे पाहा, मला सर्वात जास्त अभिमान तुझ्यावर आहे. सत्तेतील लोकांनी पूर्ण ताकद लावली. केंद्र सरकारसह अनेक राज्यातील सरकारांना करोडो रुपये खर्च करून माझ्या भावाची प्रतीमा माझ्या खराब करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर अनेक तपास यंत्रणा लावल्या, पण माझा भाऊ योद्धा आहे... योद्धा...! अदानी-अंबानींनी मोठे नेते विकत घेतले. देशातील सर्व पीएसयू विकत घेतले. देशातील मीडिया विकत घेतला. पण माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाहीत आणि विकत घेऊ शकणार देखील नाही. येथे वाचा संपुर्ण बातमी.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा क्यूट फोटो
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा क्यूट फोटो

भारत जोडो यात्रा आज यूपीत 48 KM चालेल

उत्तरप्रदेशमध्ये 'भारत जोडो यात्रे'चा बुधवारचा दुसरा दिवस आहे. राहुल-प्रियांकासोबतचा प्रवास बागपतमधील मावी कलान येथून सकाळी 6.15 वाजता सुरू झाला. प्रथम राष्ट्रगीत, त्यानंतर तिरंगा फडकवण्यात आला. तर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आज 48 किलोमीटरचा यात्रेचा प्रवास स्थलांतरींतासाठी प्रसिद्ध असलेल्या शामली जिल्ह्यातील कैरानातून जाणार आहे. राहुल आणि प्रियंका सकाळी 5.30 वाजता दिल्लीहून मावी कलान येथे पोहोचले आणि येथून यात्रेत सहभागी झाले. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...