आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी मानसा येथे पोहोचले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर यांना भेटून शोक व्यक्त केला. यानंतर राहुल गांधींनी ट्विट केले की, मुसेवालाचे आई-वडील ज्या दु:खातून जात आहेत ते वर्णन करणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य असून आम्ही त्यांना न्याय देऊ. राहुल गांधी म्हणाले की, पंजाबची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पंजाबमध्ये शांतता राखणे हे आप सरकारच्या आवाक्याबाहेर आहे. सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
मुसेवाला यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती
सिद्धू मुसेवाला पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांच्या जवळचे होते. मुसेवाला यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी मानसा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. मात्र, आम आदमी पक्षाचे डॉ.विजय सिंगला यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर आप सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली. दुसऱ्याच दिवशी मुसेवाला यांची हत्या झाली.
कायदा व सुव्यवस्थेच्या दुरवस्थेमुळे सरकार गोत्यात
पंजाबमध्ये या वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकून सरकार स्थापन केले. येथील कायदा व सुव्यवस्थेच्या दुरवस्थेमुळे आता सरकार गोत्यात आले आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर जनता आणि विरोधी पक्ष सवाल करत आहेत. धमकी मिळाल्यानंतरही मूसेवाला यांची सुरक्षा का काढून घेण्यात आली, असा सवालही केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.