आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Speaks With Family Of The Minor Girl Who Was Allegedly Raped And Murdered In New Delhi

दिल्लीत चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या:राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली, म्हणाले- न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. या बैठकीनंतर राहुल म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबाला न्याय हवा असून त्यांना आणखी काही नको. पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांना न्याय मिळत नाहीये, त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. राहुल गांधी म्हणाले की, न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू.

दुसरीकडे, स्थानिक लोकही रविवारी रात्रीपासून या घटनेचा निषेध करत आहेत. हे प्रकरण दिल्लीच्या जुन्या नांगल गावाचे आहे. जिथे स्मशानभूमीच्या वॉटर कूलरमधून पाणी आणण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात स्मशानभूमीचा पुजारी राधेश्यामसह 4 जण आरोपी आहेत. मुलीच्या आईचे म्हणणे आहे की, आरोपीने तिच्या संमतीशिवाय मुलीचे अंतिम संस्कारही केले.

आरोपींनी मुलीच्या कुटुंबाची दिशाभूल केली
पुजारी आणि त्याच्या काही साथीदारांनी मुलीच्या कुटुंबीयांना फोन करून सांगितले की, वॉटर कूलरमधून पाणी भरत असताना विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. त्याने मुलीच्या आईला सांगितले की पोलिसांना सांगू नका नाहीतर मुलीचे शवविच्छेदन केले जाईल आणि तिचे अवयव काढले जातील. असे म्हणत आरोपींनी घाईघाईने मुलीचे अंतिम संस्कार केले.

केजरीवालही पीडित कुटुंबाला भेटणार आहेत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पीडित कुटुंबाला भेटून त्यांना न्याय मिळवून देण्यात मदत करणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, भीम आर्मीचे प्रमुख चंद्र शेखर यांनीही पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांची संघटना मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी निदर्शनात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...