आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Speech, Meghalaya Election Updates । Congress MP On PM Narendra Modi In Shillong

राहुल म्हणाले- PM काहीही बोलले तरी टीव्हीवर झळकतात:मीडिया माझे भाषण दाखवत नाही; म्हणाले- TMCला मेघालयातही भाजप आणायचे आहे

शिलाँग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. यानिमित्त राहुल यांनी शिलाँगमध्ये प्रचार सभा घेतली. - Divya Marathi
मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. यानिमित्त राहुल यांनी शिलाँगमध्ये प्रचार सभा घेतली.

राहुल गांधी यांनी बुधवारी मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माध्यमांवर निशाणा साधला. राहुल म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मला संसदेत प्रश्न विचारला आणि म्हणाले- माझे नाव गांधी आहे, नेहरू का नाही? मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले, पण प्रसारमाध्यमांनी ते कुठेही दाखवले नाही.

राहुल पुढे म्हणाले की, तुम्ही पाहिले असेल की जेव्हा पंतप्रधान भाषण करतात तेव्हा संपूर्ण टीव्ही माध्यमांवर झळकतात, पण माध्यमे माझे भाषण दाखवत नाही.

राहुल गांधी शिलाँगला पोहोचल्यानंतरचे हे छायाचित्र आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
राहुल गांधी शिलाँगला पोहोचल्यानंतरचे हे छायाचित्र आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

राहुल म्हणाले - TMCला मेघालयमध्ये भाजपची सत्ता आणायची आहे

मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. याकरिता राहुल यांनी शिलाँगमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि TMCवर निशाणा साधला. तुम्हाला TMCचा इतिहास माहीत आहे, असे त्यांनी जनतेला सांगितले. बंगालमधील हिंसाचाराचीही आपल्याला माहिती आहे. त्याची परंपरा साऱ्या जगाला माहीत आहे. TMCने गोव्यात जाऊन निवडणुकीदरम्यान भरपूर पैसा खर्च केला, कारण त्यांचा उद्देश भाजपला मदत करणे हा होता. मेघालयातही भाजपला सत्तेत आणण्याचे TMCचे उद्दिष्ट आहे.

राहुल म्हणाले - अदानींसोबतच्या संबंधांवर पंतप्रधान काहीही बोलत नाहीत

मेघालयात राहुल यांनी पीएम मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मी संसदेत पंतप्रधानांना अदानीसोबतच्या संबंधांबद्दल विचारले होते. मी सर्व सदस्यांना एक चित्रही दाखवले, ज्यामध्ये पंतप्रधान आणि अदानी विमानात एकत्र बसले आहेत. हे विमान फक्त अदानीचे होते. मोदींनी माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत पंतप्रधान मोदींनी याविषयीच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, उलट माझ्या आडनावाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

राहुल पुढे म्हणाले की, मीडिया सध्या माझे भाषण दाखवत नाही. देशातील मीडियावर पंतप्रधान मोदींशी संबंध असलेल्या 2 ते 3 बड्या उद्योगपतींचे नियंत्रण आहे.