आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मोहीम सुरू केली. ते तीन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांनी याची सुरुवात कोईम्बतूरमध्ये रोड शोने केली. यावेळी, केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी निशाणा साधला. राज्यात एप्रिल किंवा मेच्या सुरुवातीच्या काळात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
Mr. Narendra Modi is, one by one, selling everything that belongs to the people of India.
— Congress (@INCIndia) January 23, 2021
- Shri @RahulGandhi#TamilNaduWelcomesRahul pic.twitter.com/H58GyFvyMh
खुल्या व्हॅनमध्ये रोड शो करत असलेले राहुल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बड्या उद्योजकांशी भागीदारी केली आणि लोकांच्या मालकीचे सर्व काही विकले. यानंतर त्यांनी व्यावसायिकांशी संवाद साधताना GST चा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, UPA सरकारची वचनबद्धता आहे की आम्ही सत्तेत आल्यावर GST ची पुनर्रचना करू. मोदी सरकारने GST योग्य पध्दतीने लागू केलेला नाही, असे राहुल यांनी यापूर्वीही म्हटले आहे. जीडीपीतील घसरण हे जीएसटी अपयशाचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोदी सरकारवर निशाणा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.