आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Twitter Account Locked Update | Congress Leader Rahul Gandhi To Twitter Over His 19 Million Followers

ट्विटर हँडल ब्लॉक:राहुल गांधी म्हणाले- ट्विटर माझ्या 1.9 कोटी फॉलोअर्सचा हक्क हिसकावतेय, हा तर लोकशाहीवरच हल्ला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल यांच्या ट्विटवर बाल आयोगाने केली होती तक्रार

राहुल गांधी यांनी ट्विटर अकाउंट ब्लॉक केल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. त्याचे शीर्षक आहे 'ट्विटर का खतरनाक खेल...' राहुल म्हणाले आहेत, 'माझे ट्विटर खाते बंद करून ते राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत. एक कंपनी आमचे राजकारण परिभाषित करण्याला बिझनेस बनवत आहे. एक राजकारणी म्हणून मला ते आवडलेले नाही.

हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे. हा केवळ राहुल गांधींवर हल्ला नाही. माझे 19 ते 20 मिलियन फॉलोअर आहेत. तुम्ही माझे मत जाणून घेण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढून घेत आहात. ते या गोष्टीला चूक ठरवत आहेत की, ट्विटर एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म आहे. हे खूप धोकादायक आहे. आपल्या लोकशाहीवर हल्ला होत आहे. ट्विटर हे भेदभाव करणारे व्यासपीठ बनले आहे.

राहुल गांधी नाराज आहेत कारण ट्विटरने गेल्या शनिवारी राहुल गांधींचे हँडल ब्लॉक केले होते. राहुल यांनी बलात्कार पीडित मुलीच्या आई -वडिलांचा फोटो दिल्लीहून शेअर केल्याने ही कारवाई करण्यात आली होती. ट्विटरने याला त्याच्या नियमांचे उल्लंघन म्हटले आहे.

राहुल यांच्या ट्विटवर बाल आयोगाने केली होती तक्रार
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) राहुल यांच्या ट्विटबाबत दिल्ली पोलिस आणि ट्विटरकडे तक्रार केली होती. पीडित मुलीच्या कुटुंबाचा फोटो पोस्ट केल्याबद्दल एनसीपीसीआरने राहुलवर कारवाईची मागणी केली होती. आयोगाने म्हटले आहे की हे बाल न्याय कायदा आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याचे उल्लंघन आहे.

काँग्रेसच्या इतर 5 नेत्यांचे हँडलही झाले होते ब्लॉक
बुधवारी रात्री काँग्रेसने दावा केला की आणखी पाच वरिष्ठ नेत्यांची ट्विटर खाती देखील लॉक करण्यात आली होती. यामध्ये पक्षाचे सरचिटणीस आणि माजी मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचा समावेश आहे. पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडलही लॉक असल्याचा दावा केला जात आहे.

या मुद्द्यावर काँग्रेसने फेसबुकवर लिहिले, 'जेव्हा आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा आम्ही घाबरलो नाही मग आता ट्विटर खाती बंद केल्याने आम्ही का घाबरू. आम्ही काँग्रेस आहोत, हा जनतेचा संदेश आहे, आम्ही लढू, आम्ही लढत राहू. बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणे हा जर गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा शंभर वेळा करू. जय हिंद ... सत्यमेव जयते. '

बातम्या आणखी आहेत...