आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी एका नव्या लुकमध्ये ब्रिटनला पोहोचले. आपल्या 7 दिवसीय ब्रिटन दौऱ्याची सुरुवात त्यांनी केंब्रिज विद्यापीठात भाषणाने केली. राहुल बिझनेस स्कुलच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले - आपण लोकशाही व्यवस्था नसलेल्या जगाची निर्मिती होताना पाहू शकत नाही. त्यामुळे याविषयी आपल्याला नव्याने विचार करावा लागेल.
राहुल यांचे भाषण लर्निंग टू लिसन म्हणजे ऐकण्याच्या कलेवर केंद्रीत होते. ते म्हणाले की, ऐकण्याची शक्ती खूप ताकदवान असते. यावेळी त्यांनी लोकशाही व्यवस्थेसाठी नव्या विचारांचे आवाहन केले. ते म्हणाले की, जगातील लोकशाही वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या विचारांची गरज आहे. पण ती थोपली जाऊ नये. आपल्या भाषणात राहुल यांनी भारत जोडो यात्रेचाही उल्लेख केला.
राहुल यांचे लेक्चर 3 टप्प्यांत विभागले होते...
पहिल्या भागात भारत जोडो यात्रेचा उल्लेख
राहुल गांधी यांचे भाषण 3 टप्प्यांत विभागले होते. त्याची सुरुवात भारत जोडो यात्रेने झाली. राहुल केंब्रिजच्या विद्यार्थ्यांना म्हणाले की, यात्रा एक प्रवास आहे. त्यात लोक स्वतःऐवजी दुसऱ्यांचे ऐकतात. या यात्रेद्वारे त्यांनी भारतातील बेरोजगारी, अन्याय व सातत्याने वाढणाऱ्या असमानविरोधात लक्ष्य खेचले. राहुल यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली. 3570 किमीचे अंतर कापताना या यात्रेने 146 दिवसांत 14 राज्यांतून प्रवास केला.
दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख
राहुल यांच्या भाषणाच्या दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख आहे. त्यात प्रामुख्याने 1991 मध्ये सोव्हियत युनियनचे विघटन झाल्यानंतर अमेरिका व चीनच्या 2 वेगवेगळ्या पैलूंवर केंद्रीत होते. राहुल गांधी म्हणाले - उत्पादनाशी संबंधित नोकऱ्या संपुष्टात आणण्यासह अमेरिकेने 11 सप्टेंबर 2001 च्या अतिरेकी हल्ल्यानंतर स्वतःला मर्यादित केले. याऊलट चीनच्या साम्यावदाी पक्षाशी संबंधित संघटनांच्या माध्यमातून सुसंवादाला प्रोत्साहन दिले.
त्यांनी भारत व अमेरिकेसारख्या लोकशाही देशांतील सातत्याने घटणाऱ्या उत्पादनाचा उल्लेख करत या बदलांमुळे व्यापकपणे असमानता व निराशा उदयास आल्याचे स्पष्ट केले. तसेच यावर तत्काल लक्ष्य देण्याची गरजही व्यक्त केली.
तिसरा टप्पा इम्पेरेटिव्ह फॉर ए ग्लोबल कंझर्व्हेशनवर आधारित
राहुल यांच्या लेक्चरचा शेवटचा टप्पा इम्पेरेटिव्ह फॉर ए ग्लोबल कंझर्व्हेशनवर आधारित होता. त्यात ते केंब्रिजच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगताना म्हणाले की, यात्रा एक तीर्थयात्रा असते. त्यात लोक दुसऱ्यांचे ऐकण्यासाठी स्वतःहून येतात.
राहुल ब्रिटनमधील भारतीयांनाही संबोधित करणार
यासंबंधीच्या माहितीनुसार, राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठातील भाषणानंतर ब्रिटनमधील भारतीय समुदायाच्या नागरिकांनाही संबोधित करण्याची शक्यता आहे. केंब्रिज जेबीएसने ट्विट करत म्हटले होते -केंब्रिज भारतातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे स्वागत करताना आनंदी आहे.
गतवर्षी मे महिन्यातही केंब्रिजमध्ये दिले होते व्याख्यान
राहुल गांधी यांनी यापूर्वी गतवर्षी मे महिन्यात केंब्रिज विद्यापीठात गेले होते. ते तिथे आयडियाज फॉर इंडिया या विषयावर बोलणार होते. पण त्यात त्यांनी मोदी सरकावर तिखट टीका केली होती. ते म्हणाले होते की, मोदी सरकार संसद व निवडणूक आयोगासारख्या देशाच्या घटनात्मक संस्थांना आपले काम करू देत नसल्याचा आरोप केला होता. भाजपने त्यांच्या या विधानावर हरकत नोंदवली होती. देशाच्या पंतप्रधानावर परदेशात असा आरोप का करण्यात आला, असा सवाल भाजपने या प्रकरणी केला होता.
राहुल केंब्रिजचे माजी विद्यार्थी, सुरक्षेमुळे दुसऱ्या नावाने घेतली होती डिग्री
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात रॉल विंची या नावाने शिक्षण घेतले. त्यांनी 1995 मध्ये डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एमफिल केले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांना आपले नाव बदलून पदवीचे शिक्षण घ्यावे लागले. राहुल यांच्या पदवीवरून वाद सुरू झाल्यानंतर केंब्रिजचे कुलगुरू प्रा. अॅलिसन रिचर्ड यांनी एका पत्राद्वारे राहुल यांनी रॉल विंची नावाने नावाने पदवी घेतल्याचे सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.