आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Controversy; Inquiry On Statement Of Rape Victims | Congress | Rahul Gandhi

दिल्ली पोलीस पोहोचले राहुल गांधींच्या घरी:काँग्रेस नेत्याने बलात्कार पीडितांबाबत केलेल्या वक्तव्यावर पोलिसांना 4 पानी उत्तर दिले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या वेळी राहुल यांनी हे वक्तव्य केले होते. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे. - Divya Marathi
30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या वेळी राहुल यांनी हे वक्तव्य केले होते. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे.

बलात्कार पीडितांवर दिलेल्या वक्तव्यावर राहुल गांधींनी दिल्ली पोलिसांच्या नोटिशीला 10 मुद्यांमध्ये 4 पानांचे उत्तर दिले आहे. अदानीवरील माझ्या वक्तव्यामुळे असे होत आहे का, असे राहुल म्हणाले. मी 45 दिवसांपूर्वी जे बोललो होतो, त्यावर अचानक नोटीस देण्याची काय गरज?

या नोटिशीला सविस्तर उत्तर देण्यासाठी राहुल यांनी 8-10 दिवसांचा अवधी मागितला आहे. त्याचवेळी काँग्रेसने ट्विटरवर लिहिले की, 'सावरकर समजले काय... नाव राहुल गांधी आहे'.

काँग्रेस नेत्याने दिलेल्या प्राथमिक जबाबावर दिल्ली पोलिसांनी उत्तर दिले आहे. पोलिसांनी सांगितले की, राहुल यांनी दिलेल्या जबाबात कोणतीही माहिती दिलेली नाही, ज्याआधारे तपास पुढे नेला जाऊ शकतो.

दिल्ली पोलिस रविवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या बलात्कार पीडितांबाबत केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. राहुल यांनी सुमारे 2 तासांनंतर स्पेशल सीपी (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांची भेट घेतली. स्पेशल सीपी यांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधींकडून त्यांच्या वक्तव्याबाबत माहिती मागवली आहे. राहुल गांधींनी थोडा वेळ मागितला असून माहिती देऊ असे सांगितले आहे

स्पेशल सीपी हुड्डा म्हणाले- राहुल म्हणाले की भारत जोडो यात्रेदरम्यान ते अनेक लोकांना भेटले. सर्व दुवे जोडण्यासाठी थोडा वेळ लागेल. गरज पडल्यास राहुल गांधींची आणखी चौकशी केली जाईल.

दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. ते स्वतः गाडी चालवत होते.
दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. ते स्वतः गाडी चालवत होते.

राहुल यांनी श्रीनगरमधील बलात्कार पीडितांवर वक्तव्य केलं होतं
राहुल श्रीनगरमध्ये म्हणाले होते- 'मला भेटायला अनेक महिला आल्या होत्या. त्या रडत होत्या, भावूक झाल्या होत्या. त्यांच्यापैकी काहींनी त्यांच्यावर बलात्कार, विनयभंग झाल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांना कळवायचे का, असे मी त्यांना विचारले. तर त्या म्हणाल्या की राहुलजी आम्हाला फक्त तुम्हाला सांगायचे होते. पोलिसांना काहीही सांगू नका, अन्यथा आमचे आणखी नुकसान होईल.'

याच वक्तव्याबाबत पोलिसांचे पथक 15 मार्च रोजी राहुल गांधी यांना नोटीस देण्यासाठी गेले होते. टीम तिथे 3 तास थांबली, पण राहुल भेटले नाहीत. १६ मार्च रोजी दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा त्यांच्या घरी गेले. दीड तास वाट पाहिल्यानंतर राहुल यांनी त्यांची भेट घेतली आणि नोटीस घेतली.

दिल्ली पोलिसांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली
खुद्द दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पीडितेची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी राहुल यांना प्रश्नांची यादी पाठवली. पोलिसांनी त्यांना प्रश्नांची त्वरीत आणि तपशीलवार उत्तरे देण्यास सांगितले होते जेणेकरून पीडितेचे रक्षण करता येईल.