आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'प्रत्येक चोराचे आडनाव मोदीच का?' हे वक्तव्य राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचे कारण ठरले आहे. मोदी आडनाव बदनामीप्रकरणी सुरत न्यायालयाने शिक्षेची घोषणा केल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. राहुल यांच्यावरील या कारवाईनंतर त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी हे देशभरात चर्चेत आले आहेत.
सुरतला हिऱ्यांचे शहर म्हटले जाते. येथील सुरत पश्चिम मतदारसंघाचे आमदार पूर्णेश मोदी आता भाजपचे हिरो बनले आहेत. 2013 मध्ये अडाजन विधानसभा पोटनिवडणूक जिंकून ते पहिल्यांदा आमदार झाले. पूर्णेश हे गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत.
पूर्णेश मोदी हे कायद्याचे पदवीधर
पूर्णेश मोदी यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1965 रोजी सुरत येथे झाला. त्यांच्या पत्नीचे नाव बीना बेन आहे. पूर्णेश यांनी बी.कॉम. आणि एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. यावेळी ते भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवून तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. सुरतच्या अडाजन भागात पूर्णेश आपल्या कुटुंबासह राहतात.
2013 मध्ये तत्कालीन आमदार किशोरभाई व्यंकवाला यांचे आजारपणामुळे निधन झाले. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपने पूर्णेश मोदी यांना तिकीट दिले होते. तेव्हा पूर्णेश मोदी प्रचंड मतांनी विजयी झाले होते.
2017 मध्ये पुन्हा आमदार झाले
2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पूर्णेश मोदींना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत पूर्णेश मोदींना 1 लाख 11 हजार 615 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार इक्बाल दौद पटेल यांना 33 हजार 733 मते मिळाली. पूर्णेश मोदी यांनी 12 ऑगस्ट 2016 ते 25 डिसेंबर 2017 पर्यंत गुजरात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीचे सदस्य म्हणून काम केले.
नगर सेवकपदापासून कारकीर्दीला सुरुवात
पूर्णेश मोदी 2000 ते 2005 पर्यंत सुरत महापालिकेत नगरसेवक होते. यावेळी ते पालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाचे नेते होते. याशिवाय त्यांनी 2009-12 आणि 2013-16 मध्ये सुरत शहर भाजप अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
राहुल गांधींनी कर्नाटकात केले होते वक्तव्य
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी 13 एप्रिल 2019 रोजी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. राहुल म्हणाले होते- 'चोरांचे आडनाव मोदी आहे. सर्व चोरांना मोदी हे आडनाव का असते, मग तो ललित मोदी असो वा नीरव मोदी किंवा नरेंद्र मोदी."
या वक्तव्यानंतर मोदी आडनावावरून समाजात नाराजी पसरली, त्यानंतर आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत कोर्टात राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. गुरुवारी कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.