आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Vs Pegasus Snooping Row | Congress MP Rahul Gandhi On Narendra Modi, Demand Amit Shah Resignation; News And Live Updates

पेगासस हेरगिरी प्रकरण:राहुल गांधी म्हणाले - माझा फोन टॅप झाला, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी; गुहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआय संचालकांना ब्लॅकमेल केले गेले - राहुल गांधी

इस्त्रायली स्पायवेअर पेगाससवरुन दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ सुरु आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून पेगासस हेरगिरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची या प्रकरणी राजीनाम्याची मागणी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, माझा फोन टॅप झाला ही माझ्या गोपनीयतेची बाब नाही. मी लोकांचा आवाज उठवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे शस्त्र आपल्या देशाविरूद्ध वापरले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कारण पंतप्रधान आणि गृह मंत्रालय वगळता कोणालाही हे अधिकृतपणे करता येत नाही. गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे असे ते म्हणाले.

सीबीआय संचालकांना ब्लॅकमेल केले गेले - राहुल गांधी
इस्त्राईल सरकारने पेगाससचे शस्त्र म्हणून वर्गीकरण केले आहे. परंतु, आमच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी याचा उपयोग लोकशाहीविरुद्ध केला. त्यांनी आपल्या लोकांच्या आवाजावर हा हल्ला केला आहे. प्रश्न हे नाही की, त्यांनी अनिल अंबानींचा फोन टॅप केला. तर प्रश्न हा की, जेंव्हा सीबीआय याप्रकरणी एफआयआर दाखल करणार होती त्यापूर्वी सीबीआय संचालकांचा फोन टॅप करुन त्यांना ब्लॅकमेल केले गेले असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

माझा फोन टॅप केला जातोय हे मला गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले
राहुल गांधी म्हणाले की, माझा फोन टॅप केला जातोय हे मला बरेच गुप्तचर अधिकारी सांगतात. परंतु, याची मला भीती वाटत नसून मला यामुळे काही फरकही पडत नसल्याचे ते म्हणाले.

पेगासस म्हणजे काय?

  • पेगासस हे एक स्पायवेअर आहे. स्पायवेअर म्हणजे हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर. याद्वारे कोणताही फोन हॅक केला जाऊ शकतो. हॅकिंगनंतर त्या फोनचा कॅमेरा, माईक, मेसेजेस आणि कॉल यासह सर्व माहिती हॅकरवर जाते. हे स्पायवेअर इस्त्रायली कंपनी NSO ग्रुपने बनवले आहे.
  • या यादीमध्ये भारतात कोणाची नावे समाविष्ट आहेत? वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियन यांच्यानुसार, आतापर्यंत 40 भारतीय पत्रकार, तीन प्रमुख विरोधी नेते, मोदी सरकारमधील दोन मंत्री आणि एका​​​​​​​ न्यायमूर्तींची हेरगिरी झाल्याच्या वृत्ता दुजारा मिळाला आहे. पण त्यांची नावे सांगण्यात आलेली नाही.
  • पण काही बातम्यांत असे समोर येत आहे की, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेसच्या प्रमुख पत्रकारांची हेरगिरी झाली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की, भारतात हिंदुस्तान टाइम्सचे शिशिर गुप्ता आणि द वायरचे सिद्धार्थ वरदराजन यांची हेरगिरी झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...