आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संरक्षण विषयक संसदीय समितीची बुधवार बैठक पार पडली. बैठकीत सैन्य दलातील जवानांचे ड्रेस बदलण्याच्या चर्चेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच भडकले आणि त्यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी बैठकीतून वॉकआउट केला. सूत्ररांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी आरोप लावला की, बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेवर बोलण्याऐवजी सैन्याच्या गणवेशावर चर्चा सुरू होती.
संरक्षण विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जुएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधींना लडाख-चीन तणाव आणि सैनिकांना चांगली हत्यारे देण्यासंबंधी बोलायचे होते. पण, समेतीचे अध्यक्ष जुआल ओराम (भाजप) यांनी त्यांना परवानगी दिली नाही.
राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा करावी: राहुल गांधी
मिळालेल्या माहितीनुसार, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या उपस्थितीत लष्कर, हवाई दल आणि नौदलातील जवानांसाठी नव्या स्टाईलचा ड्रेस देण्याबाबतची चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, यावर चर्चा करण्याऐवजी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करावी. लडाखमधील सैन्याला मजबुत करण्याबाबत चर्चा करावी. यावेळी समितीच्या अध्यक्षांनी राहुल यांना बोलण्यास परवानगी न दिल्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी वॉकआउट केले. त्यांच्यासोबत खासदार राजीव सातव आणि रेवनाथ रेड्डी यांनीही सभात्याग केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.