आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात टाकले, तरी प्रश्न विचारत राहणार:वायनाडमध्ये राहुल यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले- पोलिस मागे लावले तरी फरक पडत नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच केरळमधील वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात पोहोचले. ते म्हणाले- माझी खासदारकी हिरावली, माझे घर हिरावून घेतले, माझ्या मागे पोलिस लावले, पण याने मला काही फरक पडत नाही. मला तुरुंगात टाकले तरी मी प्रश्न विचारतच राहीन.

राहुल गांधींच्या भाषणातील 5 महत्त्वाच्या गोष्टी...

  • मी 4 वर्षांपूर्वी येथे आलो आणि येथून खासदार झालो. येथे प्रचार करणे माझ्यासाठी वेगळे होते. मी केरळचा नाही, पण तुमच्या प्रेमामुळे मला वाटले की मी तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे.
  • वायनाडच्या लोकांना, देशातील लोकांना स्वतंत्र भारतात राहायचे आहे. जिथे त्यांची मुलं त्यांना हवं ते शिकण्यास, हवं ते करण्यास मोकळे असतील. कुणालाही असा देश नकोय, जिथे फक्त काही निवडक लोकांचेच चालते.
  • त्या लोकांना जेवढा दुष्टपणा करायचा असेल, करू द्या. निर्दयी व्हायचे असेल, होऊ द्या. मी तितकाच सज्जन होईल. भाजप देशाचे एकच व्हिजन मांडत आहे, पण आम्ही देशाचे खरे व्हिजन घेऊन चालत आहोत.
  • मी संसदेत गेलो आणि पंतप्रधानांना त्यांचे अदानीसोबतचे नाते सांगण्याबद्दल विचारले. 2014 नंतर श्रीमंतांच्या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर कसे आले? अदानीला मदत करण्यासाठी भारत आणि इस्रायलमधील संबंध बदलल्याचे मी म्हणालो.
  • ते मला जितका त्रास देतील, त्याने कळेल की मी योग्य मार्गावर आहे. असे का होत आहे, असे मी स्पीकरला विचारले, तर ते म्हणाले की, माझ्याकडे कोणताही पर्याय नाही.
राहुल गांधी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक वायनाडमधून लढवली होती. येथे ते 4.31 लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र, उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला.
राहुल गांधी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक वायनाडमधून लढवली होती. येथे ते 4.31 लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र, उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला.

राहुल आणि प्रियंकांनी रोड शो केला

राहुल गांधींनी कालपेट्टा येथे 22 मिनिटांसाठी रोड शो केला. प्रियंका गांधींसह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत दिसले. माझी खासदारकी हिरावल्याने वायनाडशी माझे नाते तुटणार नाही, तर ते अधिक मजबूत होईल, असे राहुल म्हणाले. खासदार हा फक्त एक टॅग आहे, ती एक पोस्ट आहे. भाजप तो टॅग काढून घेऊ शकतो, वायनाडच्या लोकांचा आवाज उठवण्यापासून मला रोखू शकत नाही, असे राहुल म्हणाले.

प्रियंका म्हणाल्या- मी माझ्या भावाच्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी आले आहे

राहुल यांच्या आधी प्रियंका गांधी म्हणाल्या- मला इथे येऊन आनंद झाला. माझ्या भावासोबत वायनाडला येण्याची ही खूप भावनिक भेट आहे. काल मी त्याच्या घरात त्याचे फर्निचर पॅक करत होते. नवीन जागा मिळेपर्यंत तो आईसोबत राहणार आहे. काही वर्षांपूर्वी मी देखील अशीच वेळ पाहिली जेव्हा मला घर बदलावे लागले. माझ्या मुलांनी आणि पतीने मला मदत केली, परंतु माझ्या भावाला मुले किंवा कुटुंब नाही.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, वायनाडचे लोक माझ्या भावाचे कुटुंब आहेत.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, वायनाडचे लोक माझ्या भावाचे कुटुंब आहेत.

मी भाषण देण्यात चांगली नाही. इंग्रजीही चांगली नाही. भाऊ म्हणाला की वायनाड हे माझे कुटुंब आहे, यांच्यासोबत कुटुंबासारखे बोल. त्यामुळे आज मी माझ्या भावाच्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी आले आहे. तुम्हाला माहित आहे की तो (राहुल) एक सच्चा माणूस आहे, जो न घाबरता सत्य बोलतो. लोक त्याला गप्प करू इच्छितात, तरीही तो बोलतो. तुम्हाला माहिती आहे की तो नेहमी तुमचे ऐकतो, तुमच्याशी बोलतो आणि तुमच्या मदतीसाठी तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुम्ही त्याला निवडून दिले, पण सुरत येथील न्यायालयाने त्याला 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, त्यानंतर त्याची खासदारकी हिरावण्यात आली.

संपूर्ण सरकार एका व्यक्तीला वाचवत आहे

प्रियंका म्हणाल्या- देशाचे मंत्री, खासदार आणि पंतप्रधान एका नागरिकाला त्रास देत आहेत, जो प्रश्न विचारत आहे. कारण त्यांच्याकडे राहुलच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. संपूर्ण सरकार गौतम अदानी नावाच्या एका व्यक्तीला वाचवण्यात गुंतले आहे. माझ्या भावासोबत जे घडले ते आपल्या देशात कोणत्या प्रकारची हुकूमशाही आहे हे दाखवते. ते त्यांच्या व्यवसायिक मित्रांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

राहुल यांचा हा व्हिडिओ 23 मार्च रोजी सुरत विमानतळावरील आहे. सुरत कोर्टाचा निर्णय त्याच दिवशी आला.
राहुल यांचा हा व्हिडिओ 23 मार्च रोजी सुरत विमानतळावरील आहे. सुरत कोर्टाचा निर्णय त्याच दिवशी आला.

मानहानीच्या प्रकरणात राहुल यांना शिक्षा झाली

23 मार्च रोजी सुरत न्यायालयाने राहुल यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यांना 27 मिनिटांनीच जामीन मिळाला. 2019 मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभेत मोदी आडनावाबाबत विधान केले होते. म्हटले होते - सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे. यानंतर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला.

राहुल 24 मार्च रोजी सकाळी लोकसभेत पोहोचले, जिथे त्यांनी अदानी मुद्द्यावर भाष्य केले.
राहुल 24 मार्च रोजी सकाळी लोकसभेत पोहोचले, जिथे त्यांनी अदानी मुद्द्यावर भाष्य केले.

24 मार्च : राहुल यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द

राहुल 24 मार्च रोजी सकाळी लोकसभेत पोहोचले, जिथे त्यांनी अदानी मुद्द्यावर भाष्य केले. 24 मार्च रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. केरळमधील वायनाड येथून ते लोकसभेचे सदस्य होते. लोकसभा सचिवालयाने याबाबतची माहिती देणारे पत्र जारी केले. लोकसभेच्या वेबसाइटवरूनही राहुल यांचे नाव हटवण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने 2013 च्या निकालात म्हटले होते की, जर एखादा खासदार किंवा आमदार कनिष्ठ न्यायालयात दोषी आढळला तर त्याला संसद किंवा विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाईल. या नियमानुसार राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.