आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Will Discuss With Nobel Laureate Abhijeet Banerjee Today, Talks Will Be On The Economic Impact Of Corona Crisis

राहुल गांधींनी घेतली मुलाखत:अभिजीत बॅनर्जी म्हणाले- मोठे आर्थिक पॅकेज आवश्यक; भारताने जीडीपीचा एक टक्काच पॅकेज दिले, अमेरिकेत 10% पर्यंत पोहोचले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल यांच्याशी चर्चा करताना अभिजित बॅनर्जींनी सूचविले 5 महत्वाचे उपाय, पॅकेज अत्यावश्यक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांची मुलाखत घेतली. यामध्ये कोरोना संकट आणि लॉकडाउनमुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. अर्धा तास चाललेल्या या मुलाखतीमध्ये बॅनर्जी काही उपाय सूचविले आहेत. बॅनर्जी म्हणाले, की इतक्या मोठ्या आर्थिक संकटानंतरही भारत सरकारने मोठे आर्थिक पॅकेज घोषित केले नाही. आतापर्यंत ज्या घोषणा झाल्या त्या आपल्या जीडीपीच्या तुलनेत केवळ 1 टक्का आहे. अमेरिकेबद्दल बोलावयाचे झाल्यास त्यांनी त्यांच्या जीडीपीच्या तुलनेत 10 टक्के आर्थिक पॅकेज दिले आहे. भारतात छोटे व्यापारी आणि उद्योजकांना या पॅकेजची नितांत गरज आहे असेही बॅनर्जींनी सांगितले आहे.

बॅनर्जींनी मांडल्या अर्थव्यवस्थेशी संबंधित दोन चिंता

पहिली - कंपन्यांच्या दिवाळखोरीची मालिका कशी थांबवायची? बॅनर्जी यांच्या मते याला कर्जमाफी हा उपाय होऊ शकतो.

दुसरी - बाजारात मागणी नाही. मागणी वाढवण्यासाठी गरीबांना काही पैसे दिले जाऊ शकतात. बॅनर्जी यांच्या मते, दारिद्र्य रेषेच्या वरचे 60 टक्के लोक काही प्रमाणात अधिक पैसे देत असतील तरीही नुकसान होणार नाही.

बॅनर्जी यांचे 5 मोलाचे सल्ले

एमएसएमई अर्थात छोट्या व्यापाऱ्यांसाठी कर्जाच्या हप्त्यात 3 महिन्यांची सूट दिली हा चांगला निर्णय आहे. पण, याची जबाबदारी सरकारला देखील घेता आली असती. तात्पुरत्या शिधा पत्रिकांची व्यवस्था व्हायला हवी होती. मला वाटते की आपल्याकडे मुबलक खाद्य तेल आणि डाळ साठा आहे. अनेक गरीब अजुनही यंत्रणेशी जोडलेले नाहीत. त्यांनी शिधा पत्रिकेसाठी थेट आधार व्यवस्था केल्यास त्यांच्या समस्या दूर होतील. एनजीओंच्या माध्यमातून मदत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारांना पैसे द्यायला हवे. असेही होऊ शकते की गरजूंपर्यंत पूर्ण पैसे पोहोचत नाहीत. अशात काही चुका झाल्यास त्याचीही तयारी ठेवावी लागेल. ज्या लोकांना सरकारी सवलतींचा लाभ मिळत नाही त्यांना यात सामिल करण्याचे प्रयत्न करायला हवे.

रघुराम राजन यांनी गरीबांसाठी व्यक्त केली होती 65 हजार कोटींची गरज

भारतात कोरोना आणि आर्थिक संकटावर राहुल गांधी देश आणि विदेशातील विविध विचारंवत आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. त्यांनी 30 एप्रिल रोजी अशाच पद्धतीने आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी बातचीत केली होती. यामध्ये राजन यांनी गरीबांसाठी सरकारला 65 हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित करावे लागेल असा सल्ला दिला होता.

अभिजीत बॅनर्जी यांच्याबद्दल

मूळचे भारतात जन्मलेले अभिजीत बॅनर्जी अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) मध्ये प्रोफेसर आहेत. त्यांना गतवर्षी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. एका भारतीयाला अर्थशास्त्रात नोबेल देण्याची ही 21 वर्षातील पहिली वेळ आहे. अभिजीत, त्यांच्या पत्नी एस्थर डुफ्लो आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक मायकल क्रेमर यांना जागतिक दारिद्र्य कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अर्थशास्त्राचा नोबेल देण्यात आला. अभिजीत हे ब्यूरो ऑफ द रिसर्च इन इकोनॉमिक अॅनालिसिस ऑफ डेव्हलपमेंटचे माजी अध्यक्ष आहेत. ते सेंटर फॉर इकोनॉमिक अँड पॉलिसी रिसर्चचे फेलो आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स-साइंसेज अँड द इकोनॉमिक्स सोसायटीचे सुद्धा फेलो होते.

बातम्या आणखी आहेत...