आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Will Go To Hathras Again Today To Meet The Family Of The Rape Victim

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाथरस प्रकरण LIVE:राहुल आणि प्रियंका गांधी हाथरस पीडितेच्या घरी दाखल, 50 मिनीटे बंद खोलीत भेट; भेटीनंत प्रियांका गांधींना अश्रू अनावर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी राहुल आणि प्रियंका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते.

हाथरस गँगरेप प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात नेता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत केवळ 5 लोकांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांची बंद खोलीत पीडित कुटुंबाची भेट झाली. यानंतर राहुल गांधींनी न्याय मिळेपर्यंत पीडित कुटुंबासोबत असल्याचे सांगितले. तसेच, यूपी सरकार या कुटुंबाला सुरक्षा देण्यास अयशस्वी असल्याचा आरोप केला. दरम्यान, पीडित कुटुंबाचा आक्रोश पाहून प्रियंका गांधी यांना अश्रू अनावर झाले.

राहुल गांधींना 35 खासदारांना बरोबर न्यायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा फ्लायवे (नोएडा बॉर्डर)वर अडवले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. नंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना जाण्याची परवानगी दिली आहे. तरीही काँग्रेस समर्थक गोंधळ घालत आहे. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज सुरू केला आहे.

दरम्यान आता दिल्ली-नोएडा फ्लायवेवर मोठ्या संख्येत पोलिस तैनात आहेत. रस्त्यामध्ये बॅरिकेड लावण्यात आले आहेत.तर प्रियंका गांधी म्हणाल्या की, यावेळीही जाऊ दिले नाही तर आम्ही पुन्हा प्रयत्न करु. यावेळी प्रियंका आणि राहुल गाधींसोबत काँग्रेसचे 35 खासदारही आहेत.

प्रियंका गांधी चालवत आहेत गाडी, राहुल गांधी फ्रंट सीटवर

यापूर्वी गुरुवारी राहुल आणि प्रियंका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते. दोघांना यूपी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी म्हटले होते की, त्यांनी कलम 188 चे उल्लंघन केले आहे.

पोलिसांनी राहुल गांधींची कॉलरही पकडली होती. धक्काबुक्कीत ते खाली पडले आणि त्यांच्या हाताला इजा झाली होती. राहुल आणि प्रियांका यांना चार तास ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. दोघांना गॅंगरेप पीडितेच्या कुटूंबाला भेट देण्यासाठी हाथरसच्या बुलीगड गावात जायचे होते.

जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकत नाही; राहुल गांधींचा एल्गार

राहुल गांधींचे ट्विट - पीडित कुटुंबासोबत केला जात असलेला व्यवहार मंजूर नाही

'ती गोड मुलगी आणि तिच्या कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि त्यांच्या पोलिसांद्वारे केला जात असलेल्या व्यवहार मला स्वीकार नाही. कोणत्याही हिंन्दुस्तानीने स्वीकार करु नये.' असे ट्विट करत राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

प्रियंका गांधी म्हणाल्या...
'यूपी सरकार नैतिकरित्या भ्रष्ट आहे. पीडितेला उपचार मिळाले नाहीत. वेळेवर तक्रार नोंदवण्यात आली नाही. मृतदेह बळजबरीने जाळण्यात आला. कुटुंब कैदमध्ये आहे. त्यांना दाबले जात आहे. आता त्यांना धमकी दिली जातेय की, त्यांची नार्को टेस्ट केली जाईल. हा व्यवहार देशाला स्वीकार नाही. पीडितेच्या कुटुंबाला धमकावने बंद करा.' असे म्हणत प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश सरकारव टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...