आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Will Hold A Press Conference At 12 Noon Regarding Corona, Can Discuss Many Issues; News And Live Updates

राहुल यांचा मोदींवर हल्लाबोल:काँग्रेस नेते म्हणाले - कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी पंतप्रधानांची नौटंकी जबाबदार; मृत्यू दराची आकडेवारी खोटी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणावर राहुल गांधी यांनी सांगितल्या 2 मोठ्या गोष्टी

देशात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्याच्या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असून याला पंतप्रधान मोदी यांची नौटंकी जबाबदार असल्याचे घणाघाती प्रहार राहुल गांधी यांनी केला आहे. कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी केंद्र सरकार लपवत असून मृत्यू दराची आकडेवारी खोटी दाखवत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील नागरिकांना वास्तविक माहिती सांगायला हवी असेही ते यावेळी म्हणाले.

भारत देश जगातील फॉर्मसी देश म्हणून ओळखला जातो. परंतु, मोदी सरकारच्या गुन्हेगारी कारभारामुळे आणि लसींच्या गोंधळामुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी आता मोदी सरकारला जाब विचारला पाहिजे. मोदी सरकारने आपले कर्तव्य विसरुन देशातील जनतेला वेठीस धरल्याची टिका ही त्यांनी यावेळी केली.

देशाला कोरोनापासून रोखायचे असेल तर लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे राहुल गांधी म्हणाले. परंतु, मोदी सरकारची लसीकरणाची व्यूहरचना आणि गैरकारभारामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर रखडले आहे. आमच्या सरकारने लसीकरण योजनेबाबत आपले कर्तव्य विसरले असून लस खरेदीबाबतदेखील बेफिकीर असल्याचा टोला राहुल गांधी यांनी लगावला.त्यासोबतच लसीचे वेगवेगळे दर ठरविण्यात केंद्र सरकारचा हात असल्याचे ही ते म्हणाले.

लसीकरणावर राहुल यांच्या 2 मोठ्या गोष्टी

1. सरकारचे लस धोरण अपयशी
पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले की, कोरोनाला रोखण्यासाठी कोणत्याही देशाला टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट और व्हॅक्सीनेशन या 4 गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. परंतु, यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे 70-80% लोकांचे लसीकरण व्हायला हवे होते. परंतु, सरकार खालील गोष्टींचा अनुमान लावण्यात अपयशी ठरले.

  • किती लोकांना लस लागेल?
  • लसीच्या किती डोसचे ऑर्डर करावे लागतील?
  • देशाची स्वतःची लस तयार करण्याची क्षमता किती असेल?
  • बाहेरून किती लसी मागवल्या जातील व कोण ऑर्डर देणार?

लस ऑर्डरमध्ये केंद्र सरकार अपयशी ठरले
राहुल म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता इतर देशांनी मे 2020 मध्येच लस खरेदीचे आदेश देण्यास सुरुवात केली होती. पण मोदी सरकार यामध्ये अपयधी ठरले असून त्यांनी जानेवारी 2021 मध्ये लसीची पहिली ऑर्डर दिली. सार्वजनिक माहितीनुसार, मोदी सरकार आणि राज्य सरकारांनी आपापर्यंत फक्त 39 कोटी डोस खरेदी केले आहे. परंतु, देशाची लोकसंख्या 140 कोटी असून यामध्ये 94.50 कोटी लोक 18 वर्षांवरील आहे.

बातम्या आणखी आहेत...