आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेंतर्गत राजस्थानात इतर राज्यांच्या तुलनेत दररोज थोडे जास्त चालतील. ते आतापर्यंत दररोज सरासरी 25 ते 30 किमी चालत होते. आता ते राजस्थानात दररोज सरासरी 35 किमी अंतर कापतील. यात काही दिवशी ते एका दिवसात 40 ते 50 किमीचेही अंतर कापतील. भारत जोडो यात्रा रविवारी मध्य प्रदेशातील हद्द ओलांडून राजस्थानात पोहोचेल. या यात्रेची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा प्रभाव असणाऱ्या झालावाड जिल्ह्यातून होईल. त्यांच्या स्वागतासाठी सचिन पायलट यांच्यासह अनेक मंत्री व ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित राहतील.
एकूण 520 किमीची यात्रा
राजस्थानात प्रवेश करण्यापूर्वी आम्ही राहुल यांच्या यात्रेचा मार्ग व त्यांच्या वॉकिंगचा आढावा घेतला. त्यात आम्हाला आढळले की, राहुल राजस्थानात 18 दिवसांत 520 किमी अंतर चालणार आहेत. या 18 दिवसांपैकी एक दिवस राजस्थानात प्रवेश करण्याचा व 2 दिवस विश्रांतीचे आहेत. ते 18 पैकी 15 दिवस चालतील. त्यात ते जवळपास 493 किमीचे अंतर कापतील.
राजस्थान-MP बॉर्डरवर नाइट स्टे
4 डिसेंबर रोजी राजस्थानात प्रवेश केल्यानंतर राहुल राजस्थान-मध्य प्रदेश सीमेवर रात्रीचा मुक्काम करतील. 5 डिसेंबर रोजी ते 34.2 किमी अंतर चालतील. त्यानंतर पुढील 14 दिवसांत राहुल गांधी 485 किमीचा प्रवास करतील. या हिशोबाने सरासरी एका दिवसाचा प्रवाश 34.64 किमीचा होईल. शेवटच्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी सकाळी 8 किमी चालून ते हरियाणाच्या हद्दीत प्रवेश करतील.
11 डिसेंबर रोजी सर्वाधिक 49.6 किमी चालतील
11 डिसेंबर रोजी राहुल गांधी 49.6 किलोमीटर चालतील. या दिवशी यात्रा केशवरायपाटन विदानसभेतील बाजडली फाटक येथून सुरू होऊन बबईच्या आझाद नगरपर्यंत पोहोचेल. याशिवाय 6 डिसेंबर रोजी 42.2 किमी व 19 डिसेंबर रोजी 43.9 किमी अंतर प्रवास केला जाईल. या 3 दिवसांत राहुल 40 दररोज 40 किमीहून अधिक अंतर चालतील.
झालावाड भाजपचा बालेकिल्ला
भारत जोडो यात्रा राजस्थानातील भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या झालावाड जिल्ह्यातून सुरू होईल. येथील झालरापटन विधानसभा मतदार संघातून राहुल राजस्थानात प्रवेश करतील. त्यानंतर ते बुंदी, टोंकचा काही बाग, सवाई माधोपूर, दौसा व अलवर जिल्ह्यातून हरियाणात प्रवेश करतील. झालरापाटन माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मतदार संघ आहे.
झालावाडमध्ये काँग्रेसला विजयाची प्रतीक्षा
राजस्थानातील झालावाड जिल्ह्यात काँग्रेसला अद्याप एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. राज्यात काँग्रेसचे सरकार असूनही या जिल्ह्यातील चारही जागा भाजपच्या ताब्यात आहेत. येथील झालरापाटन मतदार संघातून स्वतः वसुंधरा राजे विधानसभेवर पोहोचल्यात. तर डगहून भाजपचे कालूराम, खानपूरहून नरेंद्र नागर व मनोहरथाना येथून भाजपचे गोविंद प्रसाद आमदार आहेत.
राहुल गांधींची यात्रा राजस्थानातील ज्या 18 विधानसभा मतदार संघातून जाणार आहे, त्यातील 12 जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तर 6 जागा भाजपकडे आहेत. खास गोष्ट म्हणजे राहुल राजस्थानात प्रवेश करताना ज्या विधानसभा मतदार संघांतून जातील, तेथील 6 पैकी 5 भाजपच्या ताब्यात आहेत.
सचिन पायलट यांनी शूट केला व्हिडिओ
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी सचिन पायलट यांनी एक व्हिडिओही तयार केला आहे. या व्हिडिओत सचिन पालयट यांच्यासह अनेक बालगोपाळ व तरुण-तरुणी दिसून येत आहेत. पायलट स्वतः टी शर्ट घातलेले दिसून येत आहेत. हा व्हिडिओ शेयर करत पायलट म्हणाले - संपूर्ण राजस्थान राहुल यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहे. तुम्ही होत आहात का?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.