आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi's 40 Hour Interrogation In 4 Days, Came Out At 12 Midnight, Called Again Today

मनी लाँड्रिंग प्रकरण:राहुल गांधींची 4 दिवसांत 40 तास चौकशी, मध्यरात्री 12 वाजता आले बाहेर, आज पुन्हा बोलावले

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात सोमवारी चौथ्या वेळी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर झाले. त्याआधी १३ ते १५ जूनपर्यंत ईडीने राहुल यांची ३० तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली आहे. सोमवारी त्यांची १० तास चौकशी करण्यात आली.

या ४ दिवसांत ईडीने त्यांची ४० तास चौकशी केली आहे. सोमवारी मध्यरात्री १२ वाजता ते ईडी ऑफिसमधून बाहेर पडले. मंगळवारी त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे. ईडी मनी लाँड्रिंगअंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यात त्यांचा जबाब घेत आहे. राहुल सकाळी ११.०५ वाजता ईडी मुख्यालयात पोहोचले. काँग्रेसची निदर्शने लक्षात घेऊन या भागात कलम १४४ लागू आहे. दुपारी त्यांनी सुमारे एक तास ब्रेक घेतला आणि पुन्हा ४.४५ वाजता ईडी कार्यालयात हजेरी लावली.

बातम्या आणखी आहेत...