आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi's First Election Rally In Gujarat | 2 Minutes Silence On Morbi Bridge Tragedy At Rajkot Public Rally

राहुल गांधी यांची गुजरातमधील पहिली निवडणूक सभा:राजकोटच्या जाहीर सभेत मोरबी पूल दुर्घटनेवर 2 मिनिटांचे मौन

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदाच गुजरातमध्ये पोहोचले. त्यांनी पहिली जाहीर सभा सुरत जिल्ह्यातील महुआ तहसीलच्या पंच काकडा या गावात झाली. यानंतर ते भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राजकोटमध्ये पोहोचले. येथील शास्त्री मैदानावर जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी मोरबी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे मौन पाळले.

पाच काकडा गावात भाषण करताना राहुल गांधी यांना भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजप आदिवासींवर अन्याय करत आहे. हा देश तुमचा आहे, जो भाजपने तुमच्याकडून घेतला आहे. भाजपवाले तुम्हाला आदिवासी नाहीतर वनवासी म्हणतात. याचा अर्थ तुम्ही जंगलात राहत आहात. तुम्ही स्थलांतरित व्हावे, तुमच्या मुलांनी शहरात शिक्षण घ्यावे आणि पुढे जावे, अस त्यांना वाटत नाही. तुम्ही जंगलातच राहावे, असे भाजपचे मत आहे.

काँग्रेस आदिवासी किंवा भाजप वनवासी

राहुल गांधी पुढे म्हणाले की, तुमच्याकडे काँग्रेस आदिवासी किंवा भाजप वनवासी असे दोन पर्याय आहेत. एका बाजूला सुख आहे. तर दुसऱ्या बाजूला दुःख आहे. आम्ही तुमची स्वप्ने सत्यात उतरवू. शिक्षण, रोजगार, आरोग्य देऊ. तुमच्या इतिहासाचे रक्षण करू, जगण्याचा हक्क देऊ.

आदिवासींशी जुने नाते
माझ्या कुटुंबाचा आदिवासींशी जुना संबंध आहे. मी लहान असताना माझ्या आजी इंदिरा गांधींनी मला एक पुस्तक दिले होते. हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक होते. मला आदिवासींबद्दल फारशी माहिती नव्हती. बरेच फोटो असलेले हे आदिवासी मुलांचे पुस्तक जंगल आणि तिथल्या जगण्याबद्दल होते. हे पुस्तक मी आजीसोबत वाचायचो. दादी मला समजावत असत. एके दिवशी मी माझ्या आजीला सांगितले की मला हे पुस्तक खूप आवडले आहे. तर त्या म्हणाल्या की हे पुस्तक आपल्या जमातीबद्दल आहे. ही जमात भारताची पहिली आणि खरी मालकिन आहे. मग त्या म्हणाल्या की, भारत समजून घ्यायचा असेल तर आदिवासींचे जीवन आणि त्यांचे जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले नाते समजून घ्यावे.

मोरबी दुर्घटनेच्या दोषींवर कारवाई नाही

राजकोटमधील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी मोरबीच्या घटनेचा उल्लेख करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, मोरबी दुर्घटनेत 150 लोकांचा मृत्यू झाला. हा राजकीय मुद्दा नाही. ज्यांनी हे काम केले त्यांच्यावर कारवाई झाली नाही. या अपघाताबाबत कोणताही एफआयआर नाही. दोषींचे भाजपसोबत चांगले संबंध आहेत. पुढे राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसल्याने मी निराश आहे. भारत जोडो यात्रेला जनतेकडून भरभरून प्रेम मिळत असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...