आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपवर निशाना:राहुल गांधींनी 17 जुलैला कोरोना रुग्णांसंदर्भात केलेले भाकीत ठरले खरे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 20 लाखांच्या पुढे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागच्या महिन्यात केलेले भाकीत खरे ठरले आहे. 'देशात 10 ऑगस्टपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांवर जाईल,' असे भाकित राहुल गांधींनी केले होते. यासंदर्भात त्यांनी 17 जुलै रोजी ट्वीट केले होते, त्यांचे हे भाकीत तीन दिवसांपूर्वीच खरे झाले आहे. देशातील कोरोना रुग्णांनी 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशभरात 20.46 लाखांवर कोरोना रुग्ण आहेत.

देशात आता 20.46 लाख केस, गुरुवारी 62 हजार 170 रुग्णांची वाढ

देशात कोरोना संक्रमितांची संख्या 20.46 लाखांव गेला आहे. शुक्रवारी सकाळी 20 लाख 27 हजार 746 केस समोर आले आहेत. गुरुवारी एका दिवसात 62 हजार 170 रुग्ण वाढले. हा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. तर महाराष्ट्रात गुरुवारी सर्वात जास्त 11 हजार 514 आणि आंध्र प्रदेशात 10 हजार 328 संक्रमित सापडले.

राहुल गांधींनी 17 जुलैला केलेले ट्वीट
राहुल गांधींनी 17 जुलैला केलेले ट्वीट
बातम्या आणखी आहेत...