आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi's Target On Modi 'Time Has Seen His Death, There Is A Modi Government Which Was Not Reported'; The Government Had Said In Parliament There Is No Death Toll In The Lockdown

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउनमध्ये मजुरांचा मृत्यू:राहुल गांधींचा मोदींवर निशाणा - 'उनका मरना देखा ज़माने ने, एक मोदी सरकार है जिसे ख़बर ना हुई'; सरकारने संसदेत म्हटले होते - लॉकडाउनमधील मृत मजूरांचा आकडा नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउनच्या काळात वायी घरी परतणाऱ्या अनेक मजुरांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते
  • एका एनजीओचा दावा 24 मार्च ते 2 जूनच्या काळात अपघातांमध्ये 198 रुग्णांचा झाला मृत्यू

लॉकडाउनमध्ये मजुरांच्या मृत्यूच्या मुद्द्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी मंगळवारी ट्विट करत म्हटले - 'मोदी सरकारला माहिती नाही की, लॉकडाउनमध्ये किती रुग्णांचा मृत्यू झाला आणि कितींच्या नोकऱ्या गेल्या. "तुमने ना गिना तो क्या मौत ना हुई? हां मगर दुख है सरकार पर असर ना हुई। उनका मरना देखा जमाने ने, एक मोदी सरकार है जिसे खबर ना हुई।" असे म्हटले आहे.

सरकार संसदेत विसरले
राहुल गांधी असे म्हणाले कारण, केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, त्यांना माहिती नाही की, लॉकडाउनच्या काळात घरी परतताना किती मजूरांचा मृत्यू झाला. कोरोना काळात संसदेच्या पहिल्या सत्रातच सरकारने मान्य केले की, त्यांच्याजवळ प्रवासी मजूरांच्या मृत्यूचा कोणताही आकडा नाही. एवढेच नाही तर लॉकडाउनच्या दरम्यान किती मजुरांचा रोजगार गेला, यावरही सरकारने कोणताही सर्व्हे केलेला नाही.

...पण जनता विसरलेली नाही
एनजीओ सेव्ह लाइफ फाउंडेशनुसार 24 मार्च ते 2 जूनच्या काळात अपघातांमध्ये 198 मजुरांचा मृत्यू झाला होता. यानुसार 3 मोठ्या अपघातांमद्ये 48 मजुरांचा मृत्यू झाला होता. 16 मेला यूपीच्या औरेयामध्ये ट्रक अपघातात 24 मजुरांचा मृत्यू झाला होता. 14 मे रोजी मध्य प्रदेशच्या गुनामध्ये ट्रक-बसच्या धडकेत 8 मजुरांचा मृत्यू झाला. तर 14 मे रोजी महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये 16 मजुरांना ट्रेनने चिरडल्याने मृत्यू झाला होता.