आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्र सरकारवर निशाणा:'शेतकऱ्यांनंतर मजुरांवर वार; गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण हेच आहे मोदींजींचे शासन', राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या विधेयकानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत

काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदी सरकारवर सातत्याने निशाण साधताना दिसत आहेत. आजही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे. मोदी सरकारने महत्त्वाच्या कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्याविषयी संसदेत विधेयक मांडले होते. या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. यानंतर जवळपास 17 वर्षांनी कामगार कायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानंतर राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

आताच्या या विधेयकानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत. यासोबतच तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवुन काढून टाकता येणार आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, 'शेतकऱ्यांनंतर कामगारांवर वार, गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण, हेच आहे मोदीजींचे शासन' असा टोला त्यांनी लगावला आहे. या ट्वटिमध्ये त्यांनी एका बातमीचा फोटोही जोडला आहे.

संसदेत रोजगार सुधारणेशी संबंधित एक विधेयक पास करण्यात आले आहे. त्यानुसार नोकर कपात करण्यासाठी आता 300 कर्मचारी असणाऱ्या कंपनीला सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असणार नाही. या विधेयकामुळे गुंतवणूक आणण्यास मदत होईल व कंपन्यांनाही व्यवसाय करताना याचा फायदा होईल अंदाज व्यक्त होत आहे. नवीन विधेयकांत इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोडप्रमाणे तरतूद केली आहे. त्यानुसार 300 कर्मचारी ज्या कंपनीत काम करतात तेथील नोकर कपात करताना सरकारची मंजुरी घेण्याची आवश्यता नाही.

पूर्वी 100 कर्मचारी असलेलया कंपन्यांसाठी हा नियम होता. संसदेत सामाजिक सुरक्षा व सुरक्षेशी संबंधित इतर दोन विधेयक पास झाले. राज्यसभेत हे विधेयक बुधवारी मंजूर झाले. लोकसभेत एक दिवस आधीच याला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. विधेयकावरील चर्चे दरम्यान कामगार व रोजगार मंत्री संतोष गंगवार म्हणाले की, विधेयकाच्या माध्यमातून कामगारांचे कल्याण व ईझ ऑफ डुइंग बिझनेस या दोन्हीचे संतुलन राखले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...