आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’तील लोकांना रात्रीचा मुक्काम म्हणजे डोेकेदुखी ठरला आहे. राज्याची यंत्रणा यात्रेतील सहभागींची बडदास्त ठेवण्यात व्यग्र आहे. परंतु केंद्राच्या एनएचएआयने त्यांना मुक्कामाची व्यवस्था करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काँग्रेसच्या दौसा जिल्हाध्यक्ष रामजीलाल ओडा यांनी १७ डिसेंबर रोजी यात्रेतील लोकांसाठी रात्रीच्या विश्रांतीसाठी ‘भांडारेज इंटरचेंज’ (दिल्ली-वडोदरा एक्सप्रेस-वे) येथे मंजुरी मागितली होती. त्यावर नांगल राजावतान एसडीएमने एनएचआयला पत्र पाठवून ‘भारतमाला एक्सप्रेस-वे रेस्ट एरिया आलुदा’ साठी एनओसी मागितली. एनएचआयचे संबंधित प्रकल्प संचालक म्हणाले, यात्रेला आमच्याकडे मुक्काम करता येणार नाही. राज्यातील यंत्रणेने मात्र त्यावरून वाद वाढवण्यापेक्षा वेगळे पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
एसडीएम यांचे पत्र अन् एनएचएआयचे उत्तर
नांगल राजावतान एसडीएमने एनएचएआयला पत्र लिहिले. त्यात ते म्हणाले, यात्रेचा १३ ते १५ डिसेंबरपर्यंत हाजा भागातील मीना हायकोर्ट परिसरात उतरण्याचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. कायदा व शांततेसाठी पोलिसही तैनात होतील. विश्रांती करण्यासाठी योग्य ठिकाण हवे आहे. त्यात किती व्यक्तींना मुक्कामी राहता येईल, हेदेखील स्पष्ट करावे आणि वीज-पाण्याची काय व्यवस्था हृोईल, हेही कळवावे, असे पत्रात नमूद केले होते.
{एनएचएआयच्या नकारावर काँग्रेसने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. भारत जोडो यात्रा १४ ते १९ डिसेंबरपर्यंत दौसातून जात आहे. {एनएचएआय प्रकल्पाचे संचालक सहीराम म्हणाले, मंजुरी दिली किंवा नाही हा मुद्दा नाही. यात्रा आमच्याकडे थांबू शकणार नाही, हा विषय आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.