आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लडाख मुद्द्यावरून रविवारी पुन्हा ट्विट केले. त्यांनी संरक्षणतज्ञांच्या हवाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदीजी असताना भारतमातेची पवित्र भूमी चीनने कशी बळकावली, असा प्रश्न राहुल यांनी केला. त्याला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले.
भाजप अध्यक्षांनी केरळसाठी डिजिटल रॅली केली. यादरम्यान त्यांनी राज्याच्या कासरगोड येथील भाजपच्या कार्यालयाचेदेखील उद्घाटन केले. केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ व विरोधी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफ हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपचा मुकाबला करण्यासाठी दोघांची हातमिळवणी आहे, असे नड्डा म्हणाले. राहुल गांधी वायनाडचे खासदार आहेत. उत्तर प्रदेशच्या लोकांनी उत्तर दिले. आजकाल त्यांच्यात खूप जास्त देशप्रेम दिसू लागले आहे.
चीनविषयी वारंवार प्रश्न विचारतात. एकाच गोष्टीची आठवण करून द्यावी वाटते. भारतीय जनतेला ठाऊक आहे. डोकलामचा पेच सुरू होता. तेव्हा राहुल गुपचूप चिनी राजदूतांना भेटले होते. या भेटीची माहिती त्यांनी स्वत: जाहीर केली नाही. चीनच्या राजदूतांनी आपल्या संकेतस्थळावर याबद्दलचे छायाचित्र पोस्ट केले तेव्हा देशातील जनतेला त्याची माहिती मिळू शकली. देशाला कथनी व करणी यातील फरक लक्षात येतो, असा टोलाही नड्डांनी लगावला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.