आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधी म्हणतात:नरेंद्र मोदींशी अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण यावेळी व्हायरस विरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी फेसबूक, ट्विटरच्या माध्यमातून थेट संवाद, कोरोनाविरोधात एकजुटीचे आवाहन

कोरोना व्हायरस संदर्भात सुरू असलेल्या लॉकडाउन संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. तसेच सरकारच्या लॉकडाउन धोरणावर टीका केली. कोरोना व्हायरस थांबवण्यासाठी लॉकडाउन जारी केला आहे. त्यामध्ये वाढ सुद्धा करण्यात आली. परंतु, लॉकडाउनमुळे कोरोना थांबणार नाही. लॉकडाउन हे केवळ एका पॉज (Pause) बटण सारखे आहे. लॉकडाउन उघडताच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ शकते. व्हायरस आपले काम पुन्हा सुरू करेल असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

सरकारला राहुल गांधींचा सल्ला

कोरोनाविरोधात लढायचे असेल तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णांपेक्षा अधिक गतीने टेस्टिंग किट वाढवाव्याच लागतील. केवळ टेस्टिंग किट नव्हे, तर चाचण्यांचे प्रमाण सुद्धा स्थानिक पातळीपर्यंत वाढवावे लागेल. ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस आहे आणि ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस नाही त्या सर्व परिसरात लक्ष द्यावे लागले.

  

मोदींशी मतभेद असतील पण व्हायरस विरोधात एकत्र येऊ...

नरेंद्र मोदींशी अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण यावेळी व्हायरस विरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ असे राहुल गांधी म्हणाले आहेत. भारतात कोरोनाच्या परिस्थितीने गंभीर पल्ला गाठला आहे. अशात सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाच्या विरोधात लढा द्यायला हवा. या कठिण परिस्थितीत सरकार आणि प्रशासनासह सर्वांनी एका स्ट्रटेजीप्रमाणे काम करायला हवे. लॉकडाउनमुळे अद्याप समस्या सुटलेली नाही. यामुळे समस्या केवळ पुढे ढकलली गेली असेही राहुल यांनी सांगितले.

वायनाड, केरळ प्रशासनाचे केले कौतुक

कोरोनाशी लढताना केरळ आणि आपल्या मतदार संघ वायनाडमध्ये प्रशासनाने केलेल्या कामगिरीचे राहुल गांधींनी कौतुक केले. वायनाड आणि केरळमध्ये प्रशासनाने राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रभावीपणे काम केले आहे. त्याचाच फायदा म्हणून कोरोनाला वायनाडमध्ये यशस्वीरित्या आळा घालण्यात आले आहे. याचे श्रेय जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या सक्रीय प्रशासन यंत्रणेला द्यायला हवे असे काँग्रेस नेते म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...