आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत-चीन सीमावादावर राहुल गांधी यांनी अलीकडच्या काळात केलेली विधाने पाहता देशाने चीनसमाेर झुकावे अशी त्यांची इच्छा दिसते, असा आराेप भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर जाेरदार टीका केली.
त्रिवेदी यांनी राहुल यांच्या ‘भारत जाेडाे यात्रे’चाही समाचार घेतला. संपूर्ण यात्रेत संभ्रमापलीकडे काहीही हाती लागलेले नाही. भारताची केवळ भ्रमंती करून काहीही हाेणार नाही. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ च्या चार पिढ्या लाेटल्या आहेत. त्यासाठी आधी भारतीयत्व समजून घेता यायला हवे. यात्रेदरम्यान अभिनेता कमल हसन यांनी राहुल यांची मुलाखत घेतली हाेती. त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे चीनसमाेर शरणागती पत्करावी असे सुचवणारे आहेत. कारण त्यांच्या पक्षाचे सरकारने तेव्हा हेच केले हाेते., असे त्रिवेदी यांनी सांगितले.
१६ व १७ जानेवारीला बैठक :
भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची दाेन दिवसीय बैठक १६ व १७ जानेवारी राेजी आयाेजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा, लाेकशभा निवडणुकीबाबतची व्यूहरचना आखली जाणार आहे. त्याशिवाय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या कार्यकाळ वाढीवरही निर्णय अपेक्षित आहे. त्यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.