आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raid On A Rave Party At A Five star Hotel In Hyderabad; 142 Prestigious Possession, Including Actor, Singer|Marathi News

हैदराबाद टास्क फोर्स पोलिसांची कारवाई:हैदराबादेत पंचतारांकित हॉटेलमध्‍ये सुरु असलेल्‍या रेव्ह पार्टीवर छापा; अभिनेता, गायकासह 142 प्रतिष्ठित ताब्यात

हैदराबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचतारांकित हॉटेलवर रविवारी पहाटे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १४२ जणांना रेव्ह पार्टी करताना पकडण्यात आले. हैदराबाद टास्क फोर्स पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही जण अंमली पदार्थांचे सेवन करताना पकडले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये जप्त केलेली पावडर कोकेन असल्याची पुष्टी मिळाली आहे.

१४२ ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर बंजारा हिल्स पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पबमध्ये एक तेलगू चित्रपट अभिनेता, एक गायक आणि एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी पार्टी करताना आढळली. त्यांची चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...