आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रेनाइट घोटाळ्यासंबंधी मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीने टीआरएस सरकारचे मंत्री गंगुला कमलाकर यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले. करीमनगर व परिसरात ही कारवाई करण्यात आली. सीबीआयच्या एफआयआरशी संबंधी हे छापे आहेत. ग्रेनाइट व्यापारातील कथित गैरव्यवहारावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सुरू आहे. तिकडे तामिळनाडूत ईडीने पोलिस महासंचालक एमएम जाफर सैत यांच्या पत्नी परवीन जाफर, मुख्यमंत्री करुणानिधी यांचे सचिव राहिलेल्या राजमणिकम यांचे पुत्र आर. दुर्गाशंकर व लँडमार्क कन्स्ट्रक्शन चेन्नईचे टी उदयकुमार यांची १४.२३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई गुन्हा दाखल झालेल्या ७ जणांवर केली आली .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.