आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शिवसेना नेत्याच्या हत्येविरुद्ध रेल रोको ; पोलिसांसमक्ष घातल्या गोळ्या

अमृतसरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना (टकसाली) प्रमुख सुधीर सुरी यांच्या हत्येच्या तपासाला कलाटणी मिळाली आहे. एका विशिष्ट समुदायाविरोधात सुरी यांच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे हल्लेखोर संदीप सिंह ऊर्फ सन्नीच्या मनात राग होता,असे पोलिस तपासात समोर आले. शुक्रवारी निदर्शने करताना सुरी यांची पोलिसांसमक्ष गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शनिवारी सुरी समर्थकांनी रेल रोको आंदोलन केले. शनिवारी शवविच्छेदनानंतरच सुरी यांच्या नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. सुरी यांच्या वारसाला नोकरी द्यावी व त्यांना शहीद दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...