आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway Deparment Declear A Data Of Accidents On Railway Tracks During Lockdown; News And Live Updates

नवी दिल्ली:लॉकडाऊनदरम्यान रेल्वे रुळांवरील अपघातांमध्ये 8,733 जणांचा मृत्यू; मृतांत बहुतांश परराज्यातील प्रवासी मजुरांचा समावेश

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वेंची संख्या कमी असूनही अपघात

२०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात रेल्वे रुळांवर झालेल्या अपघातांत ८,७३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ८०५ जण जखमी झाले. रेल्वे बोर्डाने ही माहिती दिली आहे. या मृतांमध्ये बहुतांश प्रवासी मजुरांचा समावेश होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्ते मार्गाऐवजी रेल्वे रुळांच्या मार्गाने परतले तर लवकर घरी पोहचू, या भावनेतून अनेक प्रवासी मजूर रुळांवरून निघाले होते. शिवाय, कोरोनामुळे रस्ते मार्गावर जागोजाग पोलिसांना तोंड देण्यापेक्षा त्यांना टाळून जाता यावे, हा पण या मजुरांचा उद्देश होता.

लॉकडाऊन किंवा संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होईल, अशी या मजुरांना भीती होती. लॉकडाऊनमुळे एकही रेल्वे सुरू नाही, अशी पक्की भावना या मजुरांची होती. मात्र, यामुळेच अनेक मजुरांना प्राण गमवावे लागले. मध्य प्रदेशचे कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारात रेल्वेकडे अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या लाेकासंबंधीची आकडेवारी मागितली होती. यावर रेल्वे बोर्डाने जानेवारी ते डिसेंबर २०२० पर्यंतची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी संबंधित राज्यांतील पोलिसांकडून मिळाली असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

रेल्वेंची संख्या कमी असूनही अपघात
२०२० मध्ये २५ मार्चपासून कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन होते. यामुळे प्रवासी वाहतुकीला बंदी होती. मात्र, मालगाड्या सुरू होत्या. नंतर १ मेपासून मजुरांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या. तरीही अपघातातील मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...