आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:भुसावळच्या रेल्वे अभियंत्याची 6 वर्षांत पगाराशिवाय दीड कोटी रुपये ‘वर’कमाई

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • , १.६२ कोटी बेहिशेबी संपत्ती सीबीआयने केली जप्त

मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंता अवध बिहारी चतुर्वेदी याने अवघ्या ६ वर्षांत आपल्या उत्पन्नापेक्षा २१९ टक्के म्हणजे १ कोटी ६२ लाख रुपयांची बेहिशेबी संपत्ती कमावल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. सीबीआयने या अभियंत्याच्या संपत्तीवर टाच आणली आहे. सध्या तो नागपुरात कार्यरत आहे.

१ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंतापदी (दक्षिण) चतुर्वेदीची भुसावळ आणि नागपुरात नियुक्ती होती. या कालावधीत चतुर्वेदीने प्रचंड भ्रष्टाचार करत ज्ञात उत्पन्नापेक्षा २१९ टक्के म्हणजे सुमारे १ कोटी ६२ लाखांपेक्षा जास्त संपत्ती कमावली. सीबीआयने मंगळवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आणखी एक रेल्वे अधिकारी जाळ्यात : भुवनेश्वरमधील पूर्व रेल्वेचा निवृत्त प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक पी.के. जेनाही सीबीआयच्या जाळ्यात अडकला आहे. त्याने १ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत १ कोटी ९२ लाखांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने कमावल्याचे उघड झाले आहे.

चतुर्वेदीच्या भ्रष्टाचाराचा चढता आलेख
२१९ पट जास्त माया ज्ञात उत्पन्नापेक्षा
१९९४ कनिष्ठ अभियंतापदावर रुजू
२०१६ - ८६.८९ लाख रुपये संपत्ती
२०२२ - २ कोटी ७२ लाख रुपये

सीबीआयने संपत्ती - कर्जाचा लेखाजोखा मांडल्यानंतर त्याची १ कोटी ६२ लाखांच्या संपत्तीचा हिशेब लागला नाही.

बातम्या आणखी आहेत...