आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway । IRCTC। Online Train Ticket Booking Will Not Be From 11:30 Pm To 5:30 Am; Wait A Week As The System Upgrades

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या:रात्री 11:30 ते पहाटे 5:30 पर्यंत होणार नाही ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग; सिस्टिम अपग्रेड होत असल्याने आठवडाभर पाहावी लागेल वाट

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. येत्या 14 नोव्हेंबरपासून ते 21 नोव्हेंबरपर्यंत रात्री ऑनलाईन टिकीट बुक होणार नाही. रेल्वे आपल्या पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टमला अपग्रेड करत आहे.

त्यामुळे प्रवाशांना काही काळ रात्री टिकीट बुक करण्याची सुविधेपासून मुकावे लागणार आहे. नवीन रेल्वेंची संख्या आणि अन्य डेटाला अपग्रेड करण्यासाठी हा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशी रात्री 11.30 पासून पहाटे 05.30 वाजेपर्यंत ऑनलाईन प्रणालीने टिकीट बुक करू शकणार नाही.

भारतीय रेल्वेने दिलेल्या पत्रात सांगितले आहे की, नवीन रेल्वे गाड्यांची संख्या आणि जुन्या गाड्यांची आसन क्षमता याला अपग्रेड करणाऱ्यासाठी काही काळ रात्रीची बुकिंग बंद करण्यात आली आहे.

6 तास बंद राहणार PRS
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार अपग्रेडची ही प्रक्रिया 14 नोव्हेंबरपासून 20 ते 21 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे रात्री 11 वाजेपर्यंत पहाटे 5 वाजेपर्यंत PRS सिस्टीम बंद राहणार आहे. यात सहा तासातच्या दरम्यान टिकीट रिझर्वेशन, टिकीट रद्द आणि गाड्यांविषयीची माहिती अशा सर्व सेवा बंद राहणार आहे. मात्र 139 या क्रमाकांवर प्रवाशी रेल्वेसंबंधी विचारपूस करू शकता.

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक गाड्यांचे नाव बदलून स्पेशल रेल्वेगाड्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे टिकीटवाढ करण्यात आली होती. मात्र आता सिस्टीम अपग्रेड केल्यानंतर स्पेशल गाड्या आता पूर्वीच्या नावाप्रमाणेच सुरू केले जाणार आहे. सोबतच टिकीटदर देखील जुनेच असणार आहे.

प्रवाशांसाठी रेल्वेने हे दिलासादायक पाऊल उचलले आहेत. रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले की, कोरोना काळात स्पेशल रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र आता ते रद्द करून सामान्य रेल्वेगाड्या सुरू होणार आहे. त्यामुळे टिकीटदरात सुमारे 30 टक्के घट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...