आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway Job Scam In Exchange Of Land, Lalu Questioned For Four And A Half Hours In 2 Rounds

सीबीआयचा ससेमिरा:जमिनीच्या बदल्यात रेल्वे नोकरी घोटाळा, लालूंची 2 फेऱ्यांत साडेचार तास चौकशी

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत मुलगी मिसा यांच्या घरी ५ अधिकाऱ्यांकडून सवाल- जबाब

रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी (दि. ७) माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यांची नोकरी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीत दोन फेऱ्यांमध्ये चौकशी केली. प्रथम सकाळी तीन तास आणि नंतर दुपारी दीड तास प्रश्न विचारले. यापूर्वी सोमवारीच पाटण्यातील निवासस्थानी सीबीआयने राबडीदेवींची सुमारे पाच तास चौकशी केली.

सिंगापूरमधून किडनी प्रत्यारोपणानंतर लालू दिल्लीतील मिसा भारती यांच्या निवासस्थानी रहात आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी सकाळी १०.४० च्या सुमारास इंडिया गेटजवळील पंडारा पार्कमधील मिसा भारती यांच्या निवासस्थानी दोन कारमधून आले व चौकशी सुरू केली. दुपारी २.१५ च्या सुमारास पुन्हा चौकशीची दुसरी फेरी सुरू झाली. सर्व चौकशीची व्हिडिओग्राफी केली जात असून कागदपत्रेही तपासली जात आहेत.

सर्व चौकशीची व्हिडिओग्राफी, अनेक कागदपत्रांचीही केली तपासणी
लालू, राबडींसह अन्य १४ जणांविरुद्ध आरोपपत्र

सीबीआयने लालू, त्यांची पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि अन्य १४ जणांविरुद्ध गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले आहे आणि सर्व आरोपींना समन्स बजावले आहे.

मिसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी लालूप्रसाद असून मंगळवारी त्यांच्या चाैकशीसाठी पाेहाेचलेले सीबीआयचे पथक.
दिल्लीतील सत्ता उलथवूू
सीबीआयच्या या छळामुळे कोणतीही समस्या उद्भवली तर, आम्ही दिल्लीतील सत्ता उलथून टाकू, असे लालूंच्या सिंगापूरस्थित कन्या रोहिणी आचार्य यांनी म्हटले आहे.

हे आहेत आरोप :
{रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ मध्ये लालू यांच्या कार्यकाळात मध्य रेल्वेमध्ये उमेदवारांच्या अनियमित नियुक्त्या. {भरती नियम आणि प्रक्रियेचे उल्लंघन.{नियुक्तीसाठी कोणतीही जाहिरात किंवा सार्वजनिक सूचना जारी नव्हती. {पाटणामधील काही रहिवाशांना मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथे असलेल्या वेगवेगळ्या विभागीय रेल्वेमध्ये पर्याय म्हणून नियुक्त केले. {उमेदवारांनी थेट किंवा त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांद्वारे, लालूंच्या कुटुंबातील सदस्यांना प्रचलित बाजार दरांच्या एक-चतुर्थांश ते एक-पंचमांशपर्यंत अत्यंत सवलतीच्या दरात जमीन विकली.

विरोधी पक्षांकडून तीव्र टीका
^भाजपच्या राजकीय विरोधकांवर कारवाई होत केली जात आहे. भगव्या पक्षाकडून विरोधकांचा आवाज दडपून टाकला जात आहे.
- तेजस्वी यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री

सिसोदियांची ५ तास चौकशी
नवी दिल्ली । दिल्ली दारू धोरण प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले आप नेते मनीष सिसोदिया यांची ईडीने मंगळवारी पाच तास चौकशी केली. या प्रकरणी ईडीने हैदराबादस्थित मद्यविक्रेता अरुण रामचंद्र पिल्लई याला अटक केली आहे. या प्रकरणातील ही ११ वी अटक आहे. ईडी सिसोदिया यांच्या ताब्यातील सेलफोन बदलणे आणि नष्ट करणे आणि मंत्री असताना घेतलेले निर्णय आणि टाइमलाइन तपासत आहे.

बातम्या आणखी आहेत...