आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway Minister Ashwini Vaishnav Said To Increase The Speed Of Railways, 'Mission Raftaar' Will Be Introduced

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले:रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी ‘मिशन रफ्तार’ आणणार

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालवाहू रेल्वेगाड्यांचा वेग सरासरीपेक्षा दुप्पट करण्यासाठी तसेच सुपरफास्ट, मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेचा वेग ताशी २५ किमीने वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालय “मिशन रफ्तार’ आणणार असल्याची माहिती शुक्रवारी राज्यसभेत देण्यात आली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, मिशन रफ्तार स्वतंत्र प्रकल्प नसून याअंतर्गतचा निधी निश्चित केला जाऊ शकत नाही. कॅगने २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या अहवालात भारतीय रेल्वे वाहतुकीतील वक्तशीरपणा आणि प्रवासाच्या वेळेचे विश्लेषण केले आहे. रेल्वेगाड्यांचा वेग वाढवणे ही निरंतर प्रक्रिया असल्याचे असे वैष्णव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...