आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway Recuirment | India | Railway Jobs| Marathi News | 2.65 Lakh Vacancies In Railways, Only Half Of The Number Of Retirees

रेल्वे भरती:रेल्वेत 2.65 लाख पदे रिक्त, जेवढे निवृत्त होताहेत त्याच्या निम्मीच भरती

राजपालकुमार|मुजफ्फरपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे भरती केवळ 18% पदांवर भरती, यात 65% सुरक्षा श्रेणीतील

रेल्वेत २ लाख ६५ हजार ५४७ पदे रिक्त आहेत. ही रेल्वेत मंजूर पदांच्या १८% आहेत. रिक्त पदांमध्ये २१७७ राजपत्रित आहेत. २ लाख ६३ हजार ३७० अराजपत्रित आहेत. ही पदे एक-दोन वर्षांपासून रिक्त नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून ही स्थिती आहे. यामागचे मोठे कारण निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत नवीन भरतीची संख्या निम्मी होणे आहे. २००८ ते २०१८ पर्यंत दरवर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी भरती झाली आह.

मात्र, २०१९-२० मध्ये १,२८,४५६ नवी भरती झाली. जी या वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत जवळपास ४७००० पेक्षा तिप्पट आहे. गेल्या तीन वर्षांत रेल्वेत १,५०,४८३ पदांवर नवी भरती झाली आहे. याआधी २०१४-१९ मध्ये १,८४,२६२ पदांवर भरती झाली. रेल्वेत एकूण १५,२४,१७ पदे मंजूर आहेत.

दरवर्षी बॅकलॉग वाढला
रेल्वेमध्ये १९९०-९१ मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या १६.५१ लाख होते. २०००-०१ मध्ये १५.४५ लाखावर पोहोचले. यादरम्यान १.०६ लाख पदे रिक्त झाली. दुसरीकडे, २००८-०९ मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १३,८६,०११ होते. २०१६-१७ मध्ये १३,०८,३२३ आणि २०२१-२२ मध्ये १२,५८,५८० वर पोहोचली. रिक्त पदांमध्ये ८५ टक्के सुरक्षा श्रेणीतील आहेत. यात गँगमन, किमॅन, हेल्पर, पॉइंटमॅन, साहयक स्टेशन मास्टरचा समावेश आहे.

रिक्त पदे न भरल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांवर कामाचे ओझे वाढले आहे. त्याचा परिणाम कामावर होतो. - ओ.पी.शर्मा, झोनल सेक्रेटरी, ईसीआर ऑल इंडिया मेन्स फेडरेशन

रिक्त पदे न भरल्यास भविष्यात संकट उभे राहू शकते. डिसेंबरपर्यंत ५० हजार कर्मचारी निवृत्त होतील. -शिवगोपाल मिश्र सरचिटणीस, एआयआरएमएफ

अन्य युनिटमध्ये राजपत्रित ५०७ आणि अराजपत्रित १२,७६० पदे रिक्त आहेत.

झोन राजपत्रित अराजपत्रित
मध्य रेल्वे 56 27,177
पूर्व मध्य रेल्वे 170 15268
पूर्व रेल्वे 195 28204
उत्तर मध्य रेल्वे 141 19366
पूर्वोत्तर रेल्वे 62 14231
पूर्वोत्तर सीमा रेल्वे 112 15677
उत्तर रेल्वे 115 37436
उत्तर पश्चिम रेल्वे 100 15049
दक्षिण मध्य रेल्वे 43 16741
पश्चिम रेल्वे 172 26227

वर्षनिहाय निवृत्त कर्मचारी
वर्ष निवृत्त भरती
2008-09 40290 13870
2009-10 42372 11825
2010-11 43251 5913
2011-12 44360 23292
2012-13 68728 28467
2013-14 60754 31805
2014-15 59960 15191
2015-16 53654 29995
2016-17 58373 27538

बातम्या आणखी आहेत...