आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉक-4:देशात नव्या 80 रेल्वे गाड्यांसाठी आरक्षण सुरू, मोठ्या शहरांसाठी 30 मिनिटांत फुल्ल, मुंबई-चेन्नईचा समावेश

नवी दिल्ली / शरद पांडेय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही ट्रेनसाठी 10 ते 15 दिवसांची प्रतीक्षा, शताब्दी, वंदे भारत ट्रेनचीही बुकिंग

अनलॉक-४ मध्ये १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ८० नवीन गाड्यांसाठी गुरुवारपासून आरक्षणास सुरुवात झाली. लखनऊ, गोरखपूर, भागलपूरसारख्या मोठ्या शहरांना जाणाऱ्या रेल्वेसाठी आरक्षण सुरू होताच ३० मिनिटांत बुकिंग पूर्ण झाली. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच वंदे भारत व शताब्दी ट्रेनसाठी बुकिंग सुरू झाली.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव म्हणाले, मजूर पुन्हा शहरांत परतू लागले आहेत. त्यामुळे ४० जोड्या श्रमिक स्पेशल रेल्वे धावलेल्या ठिकाणांहून जाणार आहेत. बहुतांश लहान शहरांकडून मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या रेल्वेसाठी जास्त बुकिंग होत आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद-सिकंदराबाद इत्यादी. मात्र, या शहरातून येणाऱ्या ट्रेनमधून प्रवासी संख्या कमी आहे. ८० विशेष ट्रेनमधील सर्वाधिक २० ट्रेन दिल्लीकडे जाणाऱ्या आहेत.

अशा प्रकारे एकूण ३१० गाड्या धावू लागल्या आहेत. दुसऱ्यांदा सुरू झालेली वंदे भारत व शताब्दी केवळ एका मार्गावर चालवल्या जातील. वंदे भारत दिल्लीहून वाराणसी व शताब्दी दिल्लीहून लखनऊला जाईल. इतर विशेष गाड्यांप्रमाणेच वंदे भारत व शताब्दीसाठीदेखील दिल्लीला जाण्यासाठी बुकिंग जास्त होत आहे.लोकांना आता रेल्वे सुविधा सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.