आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडोदरा:रेल्वेची टाइम कॅप्सूल; 100 वस्तू 100 वर्षे जमिनीत राहतील, डीआरएम कार्यालयासमोर ठेवली जाईल टाइम कॅप्सूल

वडोदरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेच्या वतीने देशात प्रथमच “टाइम कॅप्सूल’चा प्रयोग केला जात आहे. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी वडोदरामध्ये पुढील १०० वर्षांसाठी टाइम कॅप्सूल जमिनीत उतरवले जाईल. विशेष म्हणजे टाइम कॅप्सूलच्या रूपात रेल्वे, रेल्वे ड्रायव्हरची ओळख प्रसिद्ध ब्लॅक बॉक्सच्या रूपात करेल. विख्यात भारतीय चित्रकार राजा रवी वर्मांच्या पेंटिंग्जपासून सध्याच्या कोरोना संकटकाळात अनिवार्य केलेल्या मास्कसह अनेक बाबी पुढील १०० वर्षांपर्यंत जमिनीत ६ फूट खोल उतरवल्या जातील. दिव्य भास्करचा अंकही टाइम कॅप्सूलचा भाग राहील. १५ ऑक्टोबर २१२१ रोजी ते काढण्याची योजना आहे. यामुळे १०० वर्षांनंतर तत्कालीन पिढी रेल्वे आणि आपल्या ऐतिहासिक वारशाबाबत माहिती प्राप्त करू शकेल.

वडोदरा डीआरएम अमित गुप्ता म्हणाले, वडोदरामध्ये रेल्वे हेरिटेज म्युझियमचे नुकतेच नूतनीकरण केले आहे. आगामी पिढ्यांना आपला इतिहास लक्षात राहावा, ते याच्याशी स्वत:ला जोडू शकतील हा यामागचा उद्देश आहे. वारसा संरक्षित करणे आपली जबाबदारी आहे. याच दृष्टीने हा प्रयोग केला जाईल.

डीआरएम कार्यालयासमोर ठेवली जाईल टाइम कॅप्सूल
१ ऑक्टोबरला १०० वर्षे पूर्ण केलेल्या वडोदराच्या डीएमआर कार्यालयाची इमारत “टाइम कॅप्सूल’ वडोदराच्या डीआरएम कार्यालयासमोरील बागेतील भूखंडातील जमिनीत उतरवली जाईल. गायकवाड संस्थान काळातील रेल्वेच्या डीआरएम कार्यालयाच्या इमारतीस १ ऑक्टोबर २०२० रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त रेल्वे विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत. टाइम कॅप्सूलमध्ये दिव्य भास्कर वृत्तपत्राचा अंक, राजा रवी वर्मांच्या पेंटिंग्ज व वडोदरा आणि गुजरातची ओळख सांगणाऱ्या वस्तू असतील. वडोदरा रेल्वेचे पीआरओ प्रदीप शर्मा म्हणाले, या ठिकाणास पर्यटनस्थळाच्या रूपात ओळख मिळू शकेल

बातम्या आणखी आहेत...