आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Railways Runs Special Trains For Army Personnel, Will Reach Jammu Kashmir From Bengaluru

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगळुरू:रेल्वेने आर्मीच्या जवानांसाठी चालवल्या स्पेशल ट्रेन, तीन दिवसात बंगळुरुवरुन जम्मू-काश्मीरला जाणार जवान

रेल्वेचा पुढाकारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 दिवसांपासून क्वारेंटाइनमध्ये होते जवान ,ट्रेनसोबत जवान आणि त्यांच्या सामानाचे सॅनिटायजेशन

भारतीय लष्कराच्या अंदाजे 950 जवानांसाठी भारतीय रेल्वेने दोन स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ट्रेन शुक्रवारी बंगळुरूवरुन निघाली. या ट्रेनमधून जवानांना जम्मू-काश्मीरला पोहचवले जाईल. या जवानांनी नुकतेच बंगळुरू, बेळगाव आणि सिकंदराबादमध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग घेतली आहे. ट्रेनिंग संपल्यानंतर जवानांना क्वारेंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्या सर्वांची वैद्यकीय चाचणी करुन, त्यांना आपल्या ठिकाणावर पोहचवण्याचा निर्णय घेतला.

दुसरी ट्रेन शनिवारी 18 एप्रिलला निघेल. या ट्रेनमधून जवानांना नॉर्थ ईस्टच्या राज्यात पाठवले जाईल. रेल्वेने 25 मार्चपासून सर्व ट्रेन प्रवसावर बंदी घातली होती. ही बंदी 3 मे पर्यंत सुरुच राहणार आहे. अशात लष्कराच्या मदतीसाठी रेल्वे विभागाने स्पेशल ट्रेल चालवण्याचा निर्णय घेतला.

सुरक्षेचे सर्व उपाय केले

  • बंगळुरूमधील रेल्वे स्टेशनवरील ज्या प्लॅटफॉर्मवरुन ही गाडी निघाली, त्या प्लॅटफॉर्मला सॅनिटाइज करण्यात आले.
  • ट्रेनच्या सर्व बोगींना चांगल्याप्रकारे सॅनिटाइज करण्यात आले.
  • सर्व जवानांचे आणि त्यांच्या सामानाचेही सॅनिजायजेशन करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...