आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे विभागाची माहिती:1 मे पासून आतापर्यंत 45 लाख नागरिकांनी श्रमिक ट्रेन्समधून प्रवास केला, येत्या 10 दिवसात 2600 ट्रेन्समधून 36 लाख लोक प्रवास करतील

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव म्हणाले- सध्या दररोज 200 पेक्षा जास्त श्रमिक ट्रेन्स चालवल्या जात आहेत
 • बुकिंग काउंटर उघडण्याचे आदेस रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत, आतापर्यंत 1000 काउंटर उघडले

लॉकडाउनदरम्यान रेल्वेने प्रवाशांच्या ट्रांसपोर्टेशनबाबत शनिवारी माहिती दिली. रेल्वेने म्हटले की, लॉकडाउनदरम्यान आतापर्यंत 45 लाख नागरिकांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास केला आहे. यापैकी 80 % यूपी आणि बिहारचे होते. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव म्हणाले की, पुढील 10 दिवसात 2600 ट्रेन्समधून 36 लाख प्रवासी प्रवास करतील.

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही प्रवासी मजुरांच्या येण्या-जाण्यासाठी 27 मार्चलाच अॅडवायजरी जारी केली होती. यात ट्रक किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या अवैध प्रवासाला थांबवण्याबाबत सांगण्यात आले होते.

कोणत्या राज्यात चालणार श्रमिक ट्रेन

या श्रमिक स्पेशल ट्रेन्स आंध्रप्रदेशातून असाम, बिहार-बिहार, छत्तीसगड-छत्तीसगड, दिल्ली-गुजरात, गोवा-जम्मू-काश्मीर, गुजरात-कर्नाटक, हरियाणा-झारखंड, जम्मू-काश्मीर-केरळ, कर्नाटक-मणिपूर, केरळ-ओडिशा, मध्य प्रदेश-राजस्थान, महाराष्ट्र -उत्तराखंड, पंजाब-उत्तराखंड, राजस्थान-त्रिपुरा, तमिळनाडू-उत्तर प्रदेश, तेलंगाणा-पश्चिम बंगालदरम्यान चालवल्या जातील.

रेल्वेच्या प्रेस कॉन्फ्रेंसचे अपडेट

 • रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव म्हणाले- 1 मे पासून श्रमिक ट्रेन्समधून प्रवासी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवले जात आहे.
 • ट्रेनमध्ये त्यांना मोफत अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 • यादरम्यान सोशल डिस्टेंसिंग आणि दुसऱ्या नियमांचे पालन केले जात आहे.
 • सध्या दररोज 200 पेक्षा जास्त श्रमिक ट्रेन्स चालवल्यात जात आहेत.
 • सर्व बुकिंग काउंटर उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 • आतापर्यंत 1000 काउंटर उघडण्यात आले आहेत.
 • रेल्वेच्या 6000 स्टेशन्समध्ये रेल्वेचे स्टॉल उघडण्यास सांगितले आहे.
 • 5000 कोच कोविड के्र सेंटर तयार केलो होते, यात 80 हजार बेड आहेत.
 • 17 रेल्वेचे हॉस्पिटल फक्त कोव्हिड रुग्णांसाठी तयार करण्यात आले आहेत.
 • यात 5000 बेड आहेत. 33 हॉस्पिटलमध्ये कोव्हिड केअर ब्लॉक तयार करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...