आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tickets Cancelled: Railways Said All Tickets Booked For Regular Passenger Trains For Travel On Or Before June 30 Cancelled

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुकिंग रद्द:रेल्वे विभागाकडून 30 जून पर्यंतच्या सर्वच बुकिंग रद्द; केवळ श्रमिक स्पेशल आणि स्पेशल ट्रेन धावतील

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पेशल ट्रेनसाठी 22 मे पासून वेटिंग लिस्ट होणार जारी, कोरोनाग्रस्तांना 100 टक्के रिफंड

रेल्वे विभागाने 30 जून पर्यंतचे सर्व तिकीट बुकिंग रद्द केले आहेत. तरीही श्रमिक स्पेशल आणि स्पेशल ट्रेन धावत राहतील. त्यामुळे, 30 जून पर्यंत तरी रेल्वे सेवा बहाल होणार नाहीत असे या निर्णयावरून स्पष्ट होत आहे. सामान्य वेळी लोक 120 दिवसांपूर्वी रेल्वेचे आरक्षण तिकीट बुक करू शकतात. लॉकडाउन लागू होण्यापूर्वी सुद्धा लोकांनी या कालावधीसाठी तिकीट बुक केले होते. त्यांचेच तिकीट आता रद्द केले जात आहेत.

स्पेशल ट्रेनसाठी 22 मे पासून वेटिंग लिस्ट होणार जारी

एसी स्पेशल ट्रेन सुरू केल्यानंतर रेल्वे विभाग लवकरच मेल आणि एक्सप्रेस ट्रेन सेवा सुद्धा सुरू करू शकते. रेल्वे मंत्रालयाने याची तयारी देखील सुरू केली आहे. रेल्वे मंडळाने बुधवारीच आदेश काढले होते. त्यानुसार, 22 मे पासून स्पेशल एसी ट्रेनसह इतर रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाच्या वेटिंग लिस्ट जारी केल्या जातील. तरीही आरएसी (RAC) तिकीट जारी केले जाणार नाहीत. रेल्वेने फर्स्ट एसीमध्ये 20 आणि स्लीपरमध्ये कमाल 200 पर्यंतचे वेटिंग तिकीट बुक करण्यास मंजुरी दिली आहे. यासोबतच एसी चेअर कार, एक्झिकेटिव्ह क्लास, सेकंड क्लास एसी, आणि थर्ड एसीमध्ये सुद्धा वेटिंग तिकीट बुक केले जाऊ शकतील. ही नवीन योजना 15 मे पासून बुक केल्या जाणाऱ्या आणि 22 मे नंतरच्या तिकीटांसाठी लागू केली जाणार आहे.

कोरोना संक्रमितांना शंभर टक्के रिफंड

दुसरीकडे, कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर रेल्वे प्रवास करू न शकणाऱ्या प्रवाशांना त्यांनी काढलेल्या तिकीटाचा पूर्ण रिफंड दिला जाणार आहे. रेल्वे विभागाने बुधावरी ही माहिती जारी केली. यासंदर्भात गाइडलाइन जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, कंफर्म तिकीट असतानाही स्क्रनिंगमध्ये एखाद्या प्रवाशात कोव्हिड-19 ची लक्षणे दिसून आल्यास, अर्थात ताप, खोकला असलेल्या प्रवाशांना परवानगी दिली जाणार नाही. अशात त्यांचे तिकीट रद्द करून त्यांना रिफंड दिला जाईल.

बातम्या आणखी आहेत...