आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Railways Says, Plans Underway To Gradually Restart Passenger Train Services From May 12

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेला ग्रीन सिग्नल:बुकिंग सुरू होताच आयआरसीटीसीची वेबसाइट क्रॅश; कन्फर्म टिकीट असणाऱ्यालाच प्रवास करता येईल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोक घरापासून स्टेशनपर्यंत कसे जाणार, स्टेशनहून घरी कसे येणार अद्याप स्पष्ट नाही
  • उद्यापासून 30 रेल्वे सुरू, सर्व कोच एसी; दिल्लीहून 15 शहरे जोडणार

लॉकडाऊनमुळे देशभर अडकून पडलेल्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. रेल्वे 12 मेपासून हळूहळू सेवा सुरू करणार आहे. मंगळवारी विशेष सुविधेनुसार 30 राजधानी रेल्वे (15 जोडी) सुरू होतील. आरक्षण सोमवारी सायंकाळी 4 पासून केवळ आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होईल. रेल्वे स्टेशन्सवर प्लॅटफॉर्म तिकिटासह सर्व बुकिंग काऊंटर बंद असतील. या रेल्वेत पँट्री असणार नाही.

ट्रॅफिक वाढल्यामुळे वेबसाइट क्रॅश

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, तिकीट फक्त आयआरसीटीसीच्या वेबसाइट्स आणि मोबाइल अॅपवरच मिळेल. रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या एजंटमार्फत तिकीट बुक होणार नाही. तत्काळा आणि प्रीमियम तत्काळचा कोणताच पर्याय नसेल. करंट बुकिंगदेखील मिळणाल नाही. तिकीट बुकिंग आज 4 पासून सुरू होणार होती, परंतूत रेल्वेची वेबसाइट लोड होत नाहीये. एकाच वेळी अनेक लोक तिकीट बुकींकसाठी येत असल्याने वेबसाइटवर लोड येत आहे.

कोणत्या रुटवर ट्रेन चालेल ?

दिल्लीहून दिब्रुगड, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवानंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावीसाठी या रेल्वे असतील. रेल्वेच्या सूत्रांनुसार, कोरोना केअर सेंटरसाठी 20 हजार बोगी राखीव आहेत. याशिवाय प्रवासी मजुरांसाठी रोज सुरू असलेल्या 300 रेल्वे यापुढेही चालू राहतील. यानंतर उरलेल्या बोगींचा अंदाज घेऊन देशभर विशेष रेल्वेे चालवल्या जाणार आहेत.

श्रमिक स्पेशल ट्रेन्समध्ये आता 1700 लोक जाऊ शकतील

लॉकडाउनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या प्रवाशांना घरी घेऊन जाण्यासाठी सुरू केलेल्या 'श्रमिक स्पेशल' ट्रेन्समध्ये आधी 1200 रुग्णांना जागा होती, पण आता 1700 जणांना प्रवास करता येणार आहे. रेल्वेने सोमवारी गाइडलाइनमध्ये बदल केले आहेत. तसेच, या स्पेशल ट्रेन्सला आता नॉन-स्टॉप चालवले जाणार नाही. म्हणजेच, ट्रेन संबंधित राज्यात डेस्टिनेशन स्टेशनशिवाय तीन ठिकाणी थांबेल.

बातम्या आणखी आहेत...