आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Railways Started Booking From The Old Rule, Advance And Tatkal Quota Tickets Will Also Be Provided

ट्रेन सुरू:उद्यापासून 200 ट्रेन्स धावणार; रेल्वेने जुन्या नियमांसोबत बुकिंग सुरू केली, अॅडव्हान्स आणि तात्काळ कोट्यातील तिकीट मिळेल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • रेल्वेने जारी केले 200 ट्रेन्सचे चार्ट, या श्रमिक आणि आधीपासून सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन्सच्या अतिरिक्त आहेत

देशात कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीदरम्यान, ट्रेन्स पटरीवर धावण्यास सज्ज झाल्या आहेत. 1 जूनपासून श्रमिक आणि स्पेशल ट्रेन्सऐवजी अतिरिक्त 200 नवीन ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. या ट्रेनसाठी 21 मे पासून बुकिंग सुरू झाली आहे. या सर्व ट्रेनमधील सर्व सीट्स बूक झाल्या आहेत.

यादरम्यान रेल्वे विभागाने तिकीट बुकींगची नवीन गाइडलाइन जारी केली आहे. आता चार महिन्यांपूर्वी अॅडव्हान्स बुकींग केली जाऊ शकेल. लॉकडाउनदरम्यान ही वेळ कमी करुन 30 दिवसांची केली होती. याशिवाय तात्काळ कोट्यातील तिकीटदेखील मिळेल. ही सुविधा रविवारी सकाळी 8 वाजेपासून सुरू होईल. याशिवाय पार्सल आणि लगेज ट्रांसपोर्टेशनसाठीही बुकींग सुरू झाली आहे.

ट्रेन प्रवासादरम्यान या नियमांचे पालन करावे लागेल

 • तिकट ऑनलाइन (आयआरसीटीसी आणि मोबाइल अॅप) आणि ऑफलाइन (पीआरएस काउंटर, तिकट एजेंट, सीएससी) वरुनच बुक होईल.
 • फक्त कंफर्म/आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांनाच स्टेशनमध्ये येण्याची आणि ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी.
 • प्रवाशांना कमीत-कमी 90 मिनीटांपूर्वी स्टेशनवर यावे लागेल.
 • ट्रेन भाड्यात कोणत्याच प्रकारचा केटरींग चार्ज सामील नाही.
 • प्रवासादरम्यान चादर, उशी, दिली जाणार नाही.
 • सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान आणि स्टेशनवर उतरल्यावर चेहऱ्यावर मास्क लावावे लागेल.
 • सर्व प्रवाशांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करावे आणि प्रवासादरम्यान सोशल डिस्टंसींगच्या नियमांचे पालन करावे.
 • प्रवासादरम्यान तिकीट चेक करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रवासादरम्यान तिकीट देण्याचा अधिकार नसेल.
 • पहिल्या चार्टला ट्रेन सुरू होण्याच्या 4 तासांपूर्वी तयार केले जाईल आणि दुसऱ्या चार्टला दोन तासांपूर्वी तयार केले जाईल.

उद्यापासून या ट्रेन्स सुरू होतील

0