आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Railways Used To Get 30 Per Cent Air In AC, Now Passengers Will Get 100 Per Cent Pure Air

सात सप्टेंबरपासून मेट्रोचा प्रवास सुरू:रेल्वेत एसीमध्ये 30 टक्के हवा मिळत होती, आता प्रवाशांना मिळेल 100 टक्के शुद्ध हवा

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिकिटांची व्यवस्था : स्मार्ट कार्डनेच प्रवास

अनलॉक-४ च्या दिशानिर्देशानुसार, देशभर मेट्रो ट्रेन चालणाऱ्या शहरांत ७ सप्टेंबरपासून मेट्रोचा प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. गुरुवारी डीएमआरसीने मेट्रोत प्रवासासाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. स्थानके व मेट्रो रेल्वेत कोणती सावधगिरी बाळगावी याची माहिती जाणून घ्या :

स्थानकावर
- प्रवाशांना मास्क वापरणे अनिवार्य असेल. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावे लागेल. एंट्री/ फ्रिस्किंग पॉइंट, ग्राहक सेवा व एएफसी प्रवेशद्वारावर एक मीटर अंतर चिन्हांकित केले आहे.
- लिफ्टमध्ये बटणाला स्पर्श करण्याची गरज नाही. फक्त २ ते ३ लोकांना लिफ्टचा वापर करता येईल.
- सर्व मेट्रो स्थानकावर ८०० अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे पथक तयार असेल. गर्दी वाढल्यास अथवा फिजिकल डिस्टन्सिंग नसल्यास ते प्रवाशांना थांबवतील.

तिकिटांची व्यवस्था : स्मार्ट कार्डनेच प्रवास
- केवळ स्मार्ट कार्ड अथवा क्यूआर कोड असणारे प्रवास करू शकतील. टोकन घेऊन सध्या तरी प्रवास करता येणार नाही.
- तिकीट व्हेंडिंग मशीनमध्ये स्मार्ट कार्ड फक्त कॅशलेस रिचार्ज करता येतील.

मेट्रोत : एक सीट सोडून बसावे लागेल
- मेट्राेमध्ये -मेट्रोमध्ये वातानुकूलित यंत्रणेतून १०० टक्के शुद्ध हवा मिळेल. आपण खुल्या जागेवर बसलो आहोत असा आभास होईल. आतापर्यंत फक्त ३० टक्के ताजी हवा मिळत होती.