आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rain 99%; Punjab, Bihar Jharkhand To Become Third Low Pressure Area From 28, Alert

मान्सून:पाऊस 99%; आता पंजाब, बिहार-झारखंडमध्ये जोरात, 28 पासून बनेल तिसरे कमी दाबाचे क्षेत्र, सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सोमवारी सकाळपर्यंत मान्सूचा ९९% पाऊस झाला आहे. तर मान्सूनच्या ढगांची रेषा उत्तरेकडे सरकल्याने पंजाब, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशात जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामान तज्ज्ञ आर.के. जेनामनी यांनी सांगितले की, भारताच्या मध्यकडे पूर्व ते पश्चिमेकडे चार किलोमीटर जाड ढगांची चादर पसरली आहे. बंगालच्या खाडीत चक्राकार हवेचे क्षेत्र तयार झाले आहे. ते २८ जुलैपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे. हे ढग पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारपासून उत्तर प्रदेशापर्यंत पुढे सरकतील. या सर्वच भागात जोरदार पाऊस होईल. जम्मू-कश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड आणि उत्तर प्रदेशात २९ जुलैपर्यंत तुफानी पाऊस होण्याची शक्यता आहे. येथे एका दिवशी २०० मि.मी. पर्यंत पाऊस होऊ शकतो.

हवामान खात्याने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात २७-२८ जुलैसाठी आणि उत्तर पश्चिम उत्तर प्रदेशात मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शिवाय कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २९ जुलैपासून धुंवाधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मप्र: नर्मदेचा जलस्तर वाढला, धरणांतील साठा वाढतोय
मध्य प्रदेशात सर्वात जास्त पाच इंच पाऊस रतलाममध्ये झाला. येथे मागील ४८ तासांत १० इंच पाऊस झाला. भोपाळ आणि इंदूरमध्ये २४ तासांत अर्धा-अर्धा इंच पाऊस झाला. पावसामुळे होशंगाबादेत नर्मदेचा जलस्तर सुमारे साडेतीन फूट वाढला आहे. इटारसीचे तवा, जबलपूरचे बरगी, भोपाळचेे कलियासोत आणि केरवा धरण झपाट्याने भरत आहे. नर्मदा नदीचा जलस्तर धोक्याच्या पातळीच्या (९६७ फूट) २८ फूट कमी आहे.

गुजरात : जामनगरात ३ तासांत १० इंच पाऊस
गुजरातेतील सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या ८८ तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. जामनगरच्या जामजोधपूर तालुक्यातील नरमाणात तीन तासांत १० इंच पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कलावडमध्ये चार तासांत सहा इंच तर ढरोल आणि जोदिया तालुक्यात म तीन इंच पाऊस नोंदवला गेला. राज्यात ३० जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. तथापि, मोसमातील ३० टक्के पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...