आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rain Continuous From 72 Hours In Telangana; Godavari Water Enters In Homes ..; Helicopters Will Also Be Deployed To Help Evacuate People

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगण:72 तासांपासून संततधार; गोदावरीचे पाणी घराघरांत..; लोकांना सुरक्षित काढण्यासाठी एनडीआरएफ तैनात, हेलिकॉप्टरचीही मदत घेणार

हैदराबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा ४% जास्त पाऊस

तेलंगणात गेल्या ७२ तासांपासून सुरू मुसळधार पावसाने स्थिती बिघडली आहे. चार जिल्ह्यांत तर दोन महिन्यांच्या पावसाचा कोटा पूर्ण झाला आहे. नद्यांचे पाणी रस्त्यांवर आणि घरापर्यंत आले आहे. गोदावरी नदीतील पाणी धोक्याच्या पातळीच्या पुढे गेले आहे. यामुळे परिसरात पूरस्थिती आहे. भद्रादी कोठागुडेम प्रशासनानुसार भद्राचलममध्ये गोदावरी नदीची पाणीपातळी ६१.२ मीटर होती. गोदावरी नदीचे पाणी मोढेगाव, अश्वपुरम गावात आणि भद्रादी कोठागुदरी जिल्ह्यातील इतर गावांत घुसले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री के. टी. रामाराव यांनी अधिकाऱ्यांसोबत वारंगलचा दौरा केला. हवामान खात्यानुसार १९ ऑगस्टच्या आसपास उत्तर बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होईल. त्यानंतर २० ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होईल. वारंगलसह अनेक भागात एनडीआरएफचे पथक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत करत असून हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे.

तेलंगणात ३८% जास्त पाऊस झाला

हवामान खात्यानुसार या पावसाळ्यात तेलंगणात ३८% जास्त पाऊस झाला आहे. १ जूनपासून आतापर्यंत ६८३.९ मिमी. पाऊस झाला. सरासरी पाऊस ४९६.६ मिमी. आहे. स्टेट डेव्हलपमेंट प्लॅनिंग सोसायटीने सांगितले की, एक डझन जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६०% जास्त पाऊस झाला आहे.

देश: आतापर्यंत सरासरीपेक्षा ४% जास्त पाऊस

गेल्या २४ तासांत कोकण, गाेवा, गुजरात आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. उत्तर तेलंगण, विदर्भ, मप्र, हिमाचल, तटीय कर्नाटक, आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. देशभरात आतापर्यंत पाऊस सरासरीपेक्षा ४% जास्त झाला आहे. मात्र, जुलैत सरासरीपेक्षा १०% कमी पाऊस झाला होता.

पुढे काय : ११ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

हवामान संस्था स्कायमेटनुसार या आठवड्यात दोन कमी दाबाचे पट्टे बनतील. यामुळे अनेक राज्यांत मान्सून सक्रिय असेल. मप्र, राजस्थान, गुजरातच्या काही भागात पुराची शक्यता आहे. येत्या २४ तासांत विदर्भ, छत्तीसगड, तेलंगण, बंगाल, कोकण, कर्नाटक, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे.