आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rain Floods । Kerla । Rain Update । Heavy Rain In Kerla, 18 People Died And Many Missing

केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार:राज्यातील अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, आतापर्यंत 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण बेपत्ता; परिस्थिती हाताबाहेर

केरळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडत आहे. संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने, जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर आतापर्यंत या मुसळधार पावसामुळे 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परतीच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागात भूस्खलनाच्या घटना देखील समोर आल्या असून, अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळत आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे त्यात अडथळा निर्माण होत आहे. हवामान विभागाने केरळमधील पाच जिल्ह्यांना दोन दिवस रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात जनजीवन विस्कळीत झाले असून, बचावकार्यासाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लष्कराला पाचारण करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळच्या किनारपट्ट्यांवर पोहोचत आहे. त्यामुळे केरळमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील अनेक भागात पावसामुळे जिवीतहानी झाली असून, कोट्टायम जिल्ह्यांत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण बेपत्ता आहे. हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

सध्या पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागात बचावकार्याला सुरुवात झाली असून, लष्कराची एक तुकडी कोट्टायममध्ये दाखल झाली आहे. एनडीआरएफची 7 तुकड्यांनीही बचावकार्य सुरु केले आहे. तसेत परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर एअर फोर्सला देखील मदत करण्यासाठी तयार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...