आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी देशातील अनेक भागात हवामानात अचानक बदल झाला. दिल्लीत धुळीचे वादळ आले, पाऊस झाला, तर रोहिणी, पितमपुरा आणि पश्चिम विहारसह अनेक ठिकाणी गारपीट झाली. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातही काही ठिकाणी धुळीच्या वादळासह पाऊस झाला. यादरम्यान ताशी ५० किमी वेगाने वारे वाहिले. यामुळे उष्णतेपासून लोकांना दिलासा मिळाला.
तत्पूर्वी हवामान विभागाने दिल्लीत वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दिल्लीचे कमाल तापमान ३८ आणि किमान २८.८ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले, तर जम्मू-काश्मिरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. उधमपूर आणि डोडामध्ये वीज कोसळल्याने दोन मुलींचा मृत्यू झाला. हैदराबादेत वादळी पाऊस झाला. खालच्या भागांमध्ये पाणी साचल्याने आणि काही ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली.बिहार, झारखंडमध्ये पाऊस शक्यहवामान विभागानुसार, देशाचे कमाल तापमान २-४ अंश सेल्सियसने खाली आले. यामुळे उत्तर, उत्तर-पश्चिम, मध्य भारतातील राज्यांना पुढील २-३ दिवसांत उकाड्यापासून दिलासा मिळेल. पश्चिमी विक्षोभामुळे पुढील ३ दिवस काही ठिकाणी ढग दाटून येण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड, प. बंगाल, ओडिशात पावसाची शक्यता आहे.हिमाचलमध्ये अनेक भागात पाऊस झाला. मनाली-लेह हायवे हिमवर्षावामुळे बाधित झाला.
हैदराबाद, रायपूरमध्येही पाऊस
हैदराबाद, पतियाळा, छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्येही मान्सूनपूर्व पाऊस झाला. शहरात ३ मे रोजी तापमान ४२.२ अंश होते. गेल्या २४ तासांत त्यात घसरण होऊन ते ३९.७ अंश नोंदले गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.