आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rains Halt Chardham Yatra In Uttarakhand; Devotees Stranded, 22 Killed In Kerala

पावसाचा हाहाकार:उत्तराखंडात पावसामुळे थांबली चारधाम यात्रा; भाविक अडकले, केरळमध्ये 22 जणांचा मृत्यू

डेहराडून / नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून केरळचे बेहाल झाले आहेत. येथे भूस्खलन तसेच इतर दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता आहेत. दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्लीसह अनेक राज्यांत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे उत्तराखंडची चारधाम यात्रा रोखण्यात आली. हवामानात बदल होईपर्यंत भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देण्यात आला असून हजारो भाविक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत सध्या असेच हवामान राहील. तर उत्तराखंडमध्ये सोमवारी दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस सुरू होता.

हवामानतज्ज्ञांनी १९ ऑक्टोबरपर्यंत उत्तराखंडमधील सर्व १३ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे यमुनोत्रीला जाणाऱ्या भाविकांना बादकोट आणि जानकीचट्टी येथे थांबवले आहे. गंगोत्रीला जाणाऱ्या भाविकांना हरसिल, भाटवारी आणि मनेरी येथे थांबवले आहे. बद्रीनाथचे भाविक जोशीमठ आणि चमोलीत थांबले आहेत. केदारनाथचे चार हजारांवर भाविक लिंचौली व भिंबारीत थांबले आहेत.

बातम्या आणखी आहेत...